आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात 7 दिवसांपासून नवीन प्रकरणे वाढत आहेत. देशात एकूण अॅक्टिव्ह प्रकरणांच्या 75% पेक्षा जास्त प्रकरणे केवळ महाराष्ट्र (44,765) आणि केरळ (59,817) मध्ये आहेत.
आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, मध्य प्रदेशात 13 फेब्रुवारीनंतरपासून प्रकरणे वाढत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये येथे जवळपास 300 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर छत्तीसगढमध्येही शुक्रवारी 250 पेक्षा जास्त प्रकरणे आढळले.
मंत्रालयानुसार, केरळमध्ये सातत्याने कोरोनाचे प्रकरणे आढळत आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातही 6 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली. अशा प्रकारे पंजाबमध्येही संक्रमितांच्या आकड्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये येथे 383 नवीन प्रकरणे समोरी आली आहेत.
दक्षिण भारतात पसरला महामारीचा नवीन N440K प्रकार
देशात आढळलेल्या कोरोनाच्या 5 हजारांपेक्षा जास्त प्रकारांवर हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (CSIR-CCMB) च्या वैज्ञानिकांनी रिचर्स केला आहे. यामध्ये आढळले की, दक्षिण भारतात सर्वात जास्त कोरोनाचा N440K प्रकार पसरला आहे. मात्र हा प्रकार कुठून आला आणि कधी पसरला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. CCMB चे डायरेक्टर राकेश मिश्र म्हणाले की, 'या प्रकाराच्या प्रसाराची कारणे आणि पद्धती जाणून घेण्यासाठी यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.'
धोकादायक प्रकारांचा भारतात कोणताही परिणाम दिसून आला नाही
CCMB संचालक प्रो. राकेश मिश्रा म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये धोकादायक बनलेल्या प्रकारांचा भारतात फारसा परिणाम दिसून आला नाही. यामागील एक कारण असेही असू शकते की आपल्या येथे जास्त सीक्वेंसिंग करण्यात आली नाही. आपल्याला व्हायरसच्या अधिक जीनोम सीक्वेंसिंग करणे आवश्यक आहे जेणेकरुन नवीन रूपे ओळखता येतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.