आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक; 5 राज्यांमधून उत्तराखंडमध्ये येणाऱ्या लोकांची होणार कोरोना टेस्ट

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 हजार नवीन केस आढळल्या, 13 हजार लोक झाले बरे

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते प्रकरणे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये BMC आणि राज्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री या बैठकीत काही मोठे निर्णय घेऊ शकतात.

दरम्यान उत्तराखंड सरकारने महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढवरुन उत्तराखंड पोहोणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या सर्व रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवर यासाठी स्पेशल व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने म्हटले की, या नियमाचे सर्वांना पालन करावे लागेल.

देशात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत जेथे रिकव्हरीपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्येही 4 राज्या आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, जम्मू काश्मीर आणि चंदीगडचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांमध्ये, पंजाबमध्ये 12, चंदीगडमध्ये 10 आणि जम्मू काश्मीरमध्ये 7 दिवसांपूर्वीपासून सलग अॅक्टव्ह प्रकरणे वाढत आहेत. केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत आहे. येथे सोमवारी 2841 अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

10 हजार नवीन केस आढळल्या, 13 हजार लोक झाले बरे
सलग 5 दिवस अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सोमवारी दिलासादायक आकडे आले. ओव्हरऑल नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी 10 हजार 493 लोक संक्रमित आढळले. तर 13 हजार 230 लोक रिकव्हर झाले. 76 रुग्णांनी जीव गमावला. अशा प्रकारे 2817 अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली. आतापर्यंत 1.10 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1.07 कोटी लोक बरे झाले आहेत. 1 लाख 56 हजार 498 रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. 1 लाख 44 हजार 332 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लसीकरणानंतर आतापर्यंत 19 लोकांनी जीव गमावला आहे
देशातील लसीकरणही वेगाने होत आहे. आतापर्यंत 1 कोटी 14 लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सला लस देण्यात आली आहे. यामध्ये 75 लाख 40 हजार 602 हेल्थ केअर वर्कर्स आणि 38 लाख 83 हजार 492 फ्रंट लाइन वर्कर्सचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणानुसर आतापर्यंत 46 लोकांना गंभीर साइड इफेक्ट्सच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 26 लोक बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. 19 लोक असे आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत.

बातम्या आणखी आहेत...