आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:126 दिवसांनंतर महाराष्ट्रात 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले; दररोजच्या नव्या रुग्णांमध्ये भारत पुन्हा चौथ्या क्रमांकावर पोहोचला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या यादीत भारत पुन्हा चौथ्या क्रमांकावर

देशात कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग सातत्याने वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रात आता विक्रमी प्रकरणे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. येथे बुधवारी 126 दिवसांनंतर पहिल्यांदाच, 24 तासांच्या आत 8 हजार नवीन रुग्ण समोर आले. आकड्यांनुसार, बुधवारी येथे 8807 लोक कोरोना संक्रमित आढळले. यापूर्वी 21 अक्टोबरला 8,142 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या यादीत भारत पुन्हा चौथ्या क्रमांकावर
दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत भारत पुन्हा एकदा जगातील चौथ्या सर्वात संक्रमित देश झाला आहे. एक आठवड्यापूर्वी या प्रकरणात भारत टॉप-10 देशांच्या यादीतून बाहेर होता. मात्र रुग्णांचा वाढता वेग पाहता आता देश चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. येथे दररोज 13 हजारांपेक्षा जास्त संक्रमित आढळत आहेत.

पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, येथे 70 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे, येथे 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. फ्रान्समध्ये रोज 20 हजारांपेक्षा जास्त केस समोर येत आहेत.

28 दिवसात पहिल्यांदा 24 तासांच्या आत 16 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले
देशात बुधवारी 16 हजार 886 लोक संक्रमित आढळले. 28 दिवसांमध्ये पहिल्यांदाच, 24 तासात 16 हजारांपेक्षा जास्त संक्रमित आढळले. यापूर्वी 28 जानेवारीला सर्वात जास्त 18 हजार 912 लोक संक्रमित आढळले होते. यासोबतच आता रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 46 हजारांवर पोहोचली आहे.

यामध्ये 1 कोटी 7 लाख 36 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 691 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 1 लाख 56 हजार 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे www.covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...