आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:​​​​​​​महाराष्ट्रानंतर आता दिल्लीमध्येही वाढत आहेत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, 3 दिवसांपासून बरे होणाऱ्यांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

महाराष्ट्रानंतर आता देशाची राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचे प्रकरणे वाढत आहेत. येथे गेल्या तीन दिवसांपासून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणजेच प्रत्येक दिवशी रिकव्हरीपेक्षा जास्त रग्ण समोर येत आहेत. सुदैवाने येथील रुग्ण संख्या पहिल्यासारखी खूप जास्त नाही.

गुरुवारी राज्यामध्ये 220 लोक संक्रमित आढळले आणि 188 लोक बरे झाले आहेत. अशा प्रकारे 32 अ‍ॅक्टिव्ह केस वाढल्या आहेत. आतापर्यंत येथे 6 लाख 38 हजार 593 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 6 लाख 26 हजार 519 लोक बरे झाले आहेत. तर 10 हजार 905 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,169 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारांपेक्षा जास्त रुग्ण
महाराष्ट्रात 127 दिवसांच्या आत सलग दुसऱ्यांदा 24 तासांमध्ये 8 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले. आकड्यांनुसार, बुधवारी येथे 8807 आणि गुरुवारी 8702 लोक संक्रमित आढळले. यापूर्वी 21 अक्टोबरला 8,142 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. गेल्या 24 तासांमध्ये येथे 3,744 लोक बरे झाले आणि 56 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे राज्यात आतापर्यंत 21 लाख 29 हजार 821 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये 20 लाख 12 हजार 367 लोक बरे झाले आहेत. तर 51 हजार 993 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांमध्ये 16 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले
गुरुवारी देशामध्ये 16 हजार 562 लोक कोरोना संक्रमित आढळले. 12 हजार 203 लोक रिकव्हर झाले आणि 118 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 63 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 7 लाख 48 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. 1 लाख 56 हजार 861 रुग्ण असे आहेत ज्यांचा मृत्यू झाला. 1 लाख 52 हजार 849 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...