आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे 67 हजारांच्या पार, गेल्या 15 दिवसांमध्ये दुप्पट झाले रुग्ण; केरळला पुन्हा टाकले मागे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांमध्ये 16 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. येथे शुक्रवारी 8,333 नवीन प्रकरणे समोर आली. आठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर येण्याचा हा सलग तिसरा दिवस होता. येथे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 दिवसांमध्ये दुप्पट झाली आहे. शनिवारी हा आकडा 67,608 एवढा झाला. तर 11 फेब्रुवारीला हा आकडा 30,265 एवढा होता.

सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. यामध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा केरळला मागे टाकले आहे. आता केरळमध्ये 51,390 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 जानेवारीला ही संख्या सर्वात जास्त 72,887 होती.

24 तासांमध्ये 16 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले
शुक्रवारी देशात 16 हजार 19 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 12 हजार 361 लोक रिकव्हर झाले आणि 109 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 79 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 7 लाख 61 हजारांपेक्षा जास्त लोक हे बरे झाले आहेत. 1 लाख 56 हजार 970 रुग्ण असे आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 56 हजार 413 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...