आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:11 राज्यांच्या 34 जिल्ह्यांमध्ये 10 दिवसांच्या आत कोरोनाचा वेग झाला दुप्पट, देशात सलग दुसऱ्या दिवशी अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1.77 कोटीपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे

देशात कोरोना रुग्णांची संख्या सलग वाढत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ असल्याची नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासांच्या आत देशात 16 हजार 824 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. 13 हजार 788 लोक रिकव्हर झाले आहेत आणि 113 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केसमध्ये 2,921 ची वाढ झाली आहे. यापूर्वी बुधवारी 3,260 आणि मंगळवारी 1,781अॅक्टिव्ह केस वाढल्या.

आकड्यांवर नजर टाकली तर देशात जवळपास 180 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान यामध्येही 34 जिल्हे असे आहेत जिथे गेल्या 10 दिवसांच्या आत रुग्ण आढळण्याचा वेग दुप्पट झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राचे सहा जिल्हे, पंजाबचे 5, केरळ आणि गुजरातचे 4-4 आणि मध्यप्रदेशचे 3 जिल्हे सामिल आहेत.

आतापर्यंत 1.11 कोटी संक्रमित
देशात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 73 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 1 कोटी 8 लाख 38 हजार लोक बरे झाले आहेत, तर 1 लाख 57 हजार 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजून 1 लाख 73 हजार 364 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

1.77 कोटीपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणाच्या 48 व्या दिवशी म्हणजेच गुरुवारपर्यंत देशात 1 कोटी 77 लाख 11 हजारांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 10 लाख 93 हजार 954 लोकांना गुरुवारीच लसीचा पहिला डोज देण्यात आला. आतापर्यंत 68 लाख 38 हजार 77 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोज आणि 30 लाख 82 हजार 942 जणांना दोन्हीही डोज देण्यात आले आहेत.

अशाप्रकारे 60 लाख 22 हजार 136 फ्रंट लाइन वर्कर्सला पहिला आणि 54 हजार 177 लोकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. 45 ते 60 वर्षांच्या आतील 2 लाख 18 हजार 939 लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 14 लाख 95 हजार वयस्करांना लसीचा पहिला डोज देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...