आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाचा नवा विक्रम:देशात आज 93 लाख लोकांचे लसीकरण, लसीकरणाचा आकडा 62 कोटींपार; देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांमध्ये वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या 3.38 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची मोहीम सुरु आहे. आज देशात लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला. सरकारच्या मते, आज देशात 93 लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले. हा आकडा लसीकरणाची सुरुवात झाल्यापासून एका दिवसात सर्वात जास्त असल्याचे मानले जात आहे. यासोबतच देशातील एकूण लसीकरणाची संख्या 62 कोटींच्या वर गेली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील वयोगटांचा समावेश आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. कॉविन पोर्टलनुसार, यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी 92 लाख डोस देण्यात आले होते. गुरुवारी देशात 24 तासात 79.48 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे हा आकडा 61.22 कोटींच्या पुढे गेला होता.

देशात सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून जास्त रुग्ण
देशात कोरोना संसर्गाचा वेग गेल्या दोन दिवसांपासून काहीसा वाढला आहे. देशात गेल्या 24 तासात 44 हजार 543 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, 32 हजार 920 रुग्ण बरे झाले आहे तर 493 लोकांचा मृत्यू झाला. यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 11,125 ने वाढ झाली आहे.

सध्या 3.38 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बुधवारी देशात 46 हजार 280 रुग्ण आढळली. केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळले. गेल्या दोन दिवसांपासून येथे 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी 30,077 रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी बुधवारी 31,445 रुग्ण आढळले होते.

देशातील कोरोना रुग्णसंख्या आकडेवारीत...

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे : 44,543
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे : 32,920
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 493
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.26 कोटी
  • आतापर्यंत बरे : 3.18 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.36 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.38 लाख
बातम्या आणखी आहेत...