आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:सलग दुसऱ्या दिवशी 40 हजारांहून जास्त रुग्ण आढळले; 11,125 सक्रिय रुग्णांमध्ये वाढ, केरळमध्ये पुन्हा नव्या रुग्णांचा आकडा 30 हजरांच्या पार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील रुग्णालयात कोरोना बाधित मुलांसाठी बनवलेला हा वॉर्ड आहे. यामध्ये खेळण्या देखील ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून मुलांचे मनोरंजन होईल. - Divya Marathi
मुंबईतील रुग्णालयात कोरोना बाधित मुलांसाठी बनवलेला हा वॉर्ड आहे. यामध्ये खेळण्या देखील ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून मुलांचे मनोरंजन होईल.

देशात कोरोना संसर्गाचा वेग गेल्या दोन दिवसांपासून काहीसा वाढला आहे. गेल्या 24 तासात, 44 हजार 543 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, 32 हजार 920 रुग्ण बरे झाले आहे तर 493 लोकांचा मृत्यू झाला. यामुळे सक्रिया कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 11,125 ने वाढ झाली आहे. सध्या 3.38 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बुधवारी देशात 46 हजार 280 रुग्ण आढळली.

केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळले. गेल्या दोन दिवसांपासून येथे 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी 30,077 रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी बुधवारी 31,445 रुग्ण आढळले होते.

महाराष्ट्रातील आकडेवारी..
महाराष्ट्रात गुरुवारी 5,108 लोक बाधित आढळले तर 4,736 लोक कोरोनामुक्त झाले. 159 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 64.42 लाख लोक संसर्गाने ग्रस्त आहेत. यापैकी 62.52 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.36 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 50,393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोनारुग्णसंख्या आकडेवारीत ...

गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे: 44,543 गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे: 32,920 गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू: 493 आतापर्यंत एकूण संक्रमित: 3.26 कोटी आतापर्यंत बरे: 3.18 कोटी आतापर्यंत एकूण मृत्यू: 4.36 लाख सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या: 3.38 लाख

बातम्या आणखी आहेत...