आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Live 10 May News Updates Delhi Kerala Maharashtra Rajasthan Haryana Cases Novel Corona Covid 19 Death Toll

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 64 हजार 388 वर: आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले- पुण्यात पहिली स्वदेशी अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन 3.0 मध्ये पाच राज्यांत 12 हजार रुग्ण वाढले, तीन मेनंतर देशात बाधितांच्या संख्येत 45% पर्यंत वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले की, पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे. यामुळे कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास मदत मिळेल. 10 राज्यात मागील 24  तासात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हर्षवर्धन यांनी सांगितल्यानुसार, 4 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात सुरुवातीपासून आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. देशभरात 4362 कोविड सेंटर आहेत. या ठिकाणी कमी किंवा अतिशय कमी लक्षणे असलेल्या 4 लाख 46 हजार 856 रुग्णांना ठेवले जाऊ शकते. त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारकडून अनेक राज्यात 72 लाख एन-95 मास्क आणि 36 लाख पीपीई किट पाठवण्यात आले आहेत.

देशातील कोरोना बाधिकांचा आकडा 6 हजार 388 झाला आहे. रविवारी दिल्लीत 381, तमिळनाडू 669, प. बंगाल 153, पंजाब 61, बिहार 52, राजस्थान 33, कर्नाटक  54, आंध्रप्रदेश 50, हरियाणा 20 सह 1500 पेक्षा जास्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या. यापूर्वी शनिवारी 2951 रुग्ण वाढले. तसेच, काल 1414 रुग्ण ठीक झाले. हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 62 हजार 939 संक्रमित आहेत. 41 हजार 472 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 19 हजार 357 ठीक झाले, तर 2109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

> ६ दिवसांत सर्वाधिक ४५२२ रुग्ण महाराष्ट्रात वाढले. या पाच राज्यांत स‌‌र्वात कमी ६३९ रुग्ण राजस्थानात आढळले.

> गुजरातमध्ये संसर्ग वाढल्याने अहमदाबाद-सुरतनंतर गांधीनगरमध्ये रविवारपासून लॉकडाऊन कडक होईल.

निमलष्कराच्या ११४ जवानांना संसर्ग, संख्या ६५० वर

शनिवारी निमलष्करी दलाचे आणखी ११४ जवान बाधित आढळले. पाचही निमलष्करी दलातील एकूण ६५० जवान बाधित झालेत. शनिवारी सीआरपीएफचे सर्वाधिक ६२ जवान बाधित आढळले. तर, आयटीबीपीचे सहा, बीएसएफचे ३५, सीआयएसएफचे १३ आणि एसएसबीचे १८ जवानही बाधित आढळले.

बातम्या आणखी आहेत...