आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Live 6 May News Updates Delhi Kerala Maharashtra Rajasthan Haryana Cases Novel Corona Covid 19 Death Toll

देशात कोरोना:कोरोना संक्रमितांचा आकडा 52 हजारांच्या पुढे; तर 14 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो प्रयागराजचा आहे. प्रवासी मजुर येथील रेल्वे स्टेशवर पोहचले. त्यांची याठिकाणी स्क्रीनिंग करण्यात आली. - Divya Marathi
फोटो प्रयागराजचा आहे. प्रवासी मजुर येथील रेल्वे स्टेशवर पोहचले. त्यांची याठिकाणी स्क्रीनिंग करण्यात आली.
  • 3 दिवसांत वाढले 10 हजार रुग्ण, भारत आता जगात 14 व्या स्थानी
  • तेलांगाणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन 29 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 52 हजार 247 झाला आहे. तर, 14 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातच आता बुधवारी कर्नाटक सरकारने 1610 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तिकडे, केरळ हायकोर्टात हॉस्पीटलमधून रुग्णांची खासगी माहिती लीक होत असल्याचा आरोप करत, याचिका दाखल झाली आहे. 

मंगळवारी महाराष्ट्रात 984, गुजरात 441, पंजाब 219, दिल्ली 206, मध्यप्रदेश 107, उत्तरप्रदेश 114, राजस्थान 97, तमिळनाडू 508 सह 2966 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या.  यापूर्वी सोमवारी सर्वात जास्त 3900 संक्रमितांची नोंद झाली. हीर आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार,  संक्रमितांची संख्या 46 हजार 711 आहे. 31 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 13 हजार 160 ठीक झाले आहेत, तर 1583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात 40 हजार ते 50 हजारपर्यंत रुग्णसंख्या सर्वात कमी वेळात पोहोचली आहे. दोन मे रोजी रुग्णसंख्या 39,248 होती. फक्त तीनच दिवसांत ही संख्या 50 हजारांजवळ पोहोचली. सोमवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक 4239 रुग्ण आढळले होते.

> महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांतच २१ हजारहून जास्त रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी ९८४ नवे रुग्ण आढळले. राज्यात एकूण १५,५२५ जण बाधित आहेत. तर गुजरातेत ४४१ नव्या रुग्णांसह बाधितांची संख्या ६२४५ झाली आहे.

> अहमदाबादेत ३४९ नव्या रुग्णांसह ४४२५ बाधित आहेत. गुजरातेतील एकूण ३६८ मृत्यूंपैकी २७३ अहमदाबादेतच झालेत.

> तेलंगण सरकारने बिघडणारी स्थिती लक्षात घेत लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता.

भास्कर आवाहन 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देशाने आतापर्यंत जो संयम दाखवला आहे, त्याच्या परीक्षेचा काळ आला आहे. आज देशात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांजवळ आहे. आपला थोडासा हलगर्जीपणा देशाला कोरोनाच्या भीषण संकटाकडे नेणारा ठरेल. त्यामुळे आपणास आवाहन आहे की, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतींचा वापर फक्त आणि फक्त अत्यावश्यक कामांसाठीच करा. विनाकारण घराबाहेर फिरू नका. कोरोना अजूनही घराच्या बाहेरच आहे. त्याला आपल्या व स्वकीयांच्या आयुष्यात प्रवेशाची संधी देऊ नका.