आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak Latest News, Health Ministry Briefing, Health Ministry Statement, School Re Opening In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा कधी सुरू होणार ?:सरकारने अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्याचे निर्देश दिले नाहीत; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिस्थिती सामान्य झाल्यावरच शाळा-कॉलेज सुरू करण्याबाब विचार केला जाईल

कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा-कॉलेज बंद आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉक- 4 सुरू होत आहे. यातच शाळा-कॉलेज सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतू, आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे की, सरकारने अद्याप शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबत कोणतेही निर्देश दिले नाहीत.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, देशात ज्या कोणत्या सुविधा सुरू केल्या जात आहेत, त्यासाठी आरोग्य मंत्रालय एसओपी जारी करते. अद्याप शाळा-कॉलेजबाबत निर्णय झालेला नाही, त्यामुळे निर्णय झाल्यानंतर एसओपी जारी केली जाईल.

परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घेतला जाईल

राज्य सरकारांच्या माध्यमातून केंद्राला पाठविलेल्या अभिप्रायात शाळा आणि पालकांनी परिस्थिती सामान्य झाल्यावरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. मुलांचे आरोग्य आणि जीवन याबद्दल तडजोड करण्याची किंवा घाई करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेतला जाणार नाही.

रिकव्हरी रेट वाढला

राजेश भूषण पुढे म्हणाले की, आज देशातील रिकव्हर झालेली प्रकरणे अॅक्टिव प्रकरणांच्या तुलनेत 3.4 पट जास्त आहेत. अॅक्टिव्ह केस एकूण प्रकरणांच्या फक्त 22.2% आहेत. रिकव्हरी दर आता 75% पेक्षा जास्त आहे. 24 तासात अॅक्टिव्ह प्रकरणात 6423 ची कपात झाली आहे. एकूण अॅक्टीव्ह प्रकरणांपैकी 2.70% प्रकरणे ऑक्सीजन सपोर्टवर आहेत.

एकूण मृतांपैकी 69% पुरुष

भूषण यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत कोरोनामुळे 58,390 मृत्यू झाली आहेत. यातील 69% पुरुष आणि 31% महिला आहेत. 36% 45-60 वयोगटातील आणि 51% 60 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser