आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak Updates: Lancet Gave 8 Important Tips To The Center States For Vaccination; News And Live Updates

कोरोना महामारी:केंद्राने लस खरेदी करून राज्यांना द्यावी, आरोग्यसेवेचे दरही ठरवावे; लॅन्सेटने केंद्र-राज्यांना दिले 8 महत्त्वाचे सल्ले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व साधनांवर सर्वांचा समान हक्क, त्यानुसार वागणूक द्यावी

भारतात कोरोनाचे २.७१ कोटींहून जास्त रुग्ण समोर आले आहेत. ३ कोटींहून जास्त मृत्यू झाले. संसर्गाला रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. मेडिकल जर्नल लॅन्सेटने संसर्ग अतिशय भयंकर स्थितीत जाण्यापूर्वी रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला महत्त्वाचे ८ सल्ले दिले आहेत. लस खरेदी व वाटपाची जबाबदारी राज्यांना देण्याऐवजी केंद्राने ती हाताळावी. सर्वांना मोफत लस, सामूहिक प्रयत्न व मेडिकल, पॅरामेडिकल तसेच योगाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनाशी संबंधित सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सर्व मनुष्यबळाचा उपयोग करून घेण्याची शिफारसही लॅन्सेटने केली आहे.

लॅन्सेटच्या पॅनलमध्ये जगभरातील २१ तज्ञ आहेत. भारतात आरोग्य क्षेत्राची व्यापक रूपरेषा तयार करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॅन्सेट सिटिझन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. लक्ष्मी मित्तल अँड फॅमिली साऊथ एशिया इन्स्टिट्यूट व हार्वर्ड विद्यापीठाच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात आले होते. २१ सदस्यांच्या या शिफारशी लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. १९ मेपर्यंत भारतात केवळ ३ टक्के लोकसंख्येलाच डोस देण्यात आले. वास्तविक भारताला दर महिन्याला २५ कोटी डोसची गरज आहे.

सर्व साधनांवर सर्वांचा समान हक्क, त्यानुसार वागणूक द्यावी

1. लस मोफत मिळावी : कोरोनाची लस मोफत देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. त्याव्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्था यशस्वीपणे चालवली पाहिजे. रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन, रुग्णवाहिका व अंत्यसंस्कार इत्यादीसाठी तंत्रज्ञानाची भूमिका लक्षात घ्यावी.त्यामुळे रुग्णांची सोय होऊ शकेल.

2. आरोग्यसेवा सुलभ हवी : कोरोनाच्या नव्या लाटेचा विचार केल्यास आवश्यक आरोग्यसेवा सुलभ, पारदर्शक हवी. लरुग्णवाहिका, ऑक्सिजन, महत्त्वाची आैषधी व आराेग्यसेवा. त्यासाठी पारदर्शक राष्ट्रीय धोरणाची गरज आहे. आरोग्यविषयक सर्व गोष्टींवर मर्यादा असली पाहिजे. त्यातून साध्य गाठता येईल.

3. फेक न्यूज रोखण्याचा प्रयत्न हवा : मार्गदर्शन साध्या भाषेत असावे, तथ्याधारित माहिती असावी. कोरोना व्यवस्थापनावरून फेक न्यूजला रोखले पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी करावे. त्याची भाषा स्पष्ट व तथ्याधारित असावी. त्याबद्दल प्रचार-प्रसार केला जावा. स्थानिकतेचा विचार करून त्याबद्दलची माहिती त्यात असावी.

4. सर्व क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळाची मदत घ्यावी : देशात उपलब्ध सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मनुष्यबळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा. आयुषच्या (आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध व होमियोपॅथी) अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची कोरोनाविरोधातील लढाईत मदत घ्यावी.

5. राज्य सरकारने गरजूंचा प्राधान्यक्रम ठरवावा : धोरणात बदल व्हावा. केंद्रीय पातळीवर लसीची खरेदी-विक्री व वितरण केले जावे. केंद्र सरकारने लसींची खरेदी करावी आणि तिचे वाटप करावे. त्यामुळे समानता साध्य होऊ शकेल. योजनेत मोफत लसीकरणाची व्यवस्था असावी. कारण ही कल्याणकारी योजना आहे.

6. सामाजिक समन्वय, लोकसहभागावर भर द्यावा, मुंबईत त्याचा फायदा दिसला : भारतात कोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक समन्वय व लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो. मुंबईत कोरोनाच्या विरोधातील लढाईला बळकट करण्यासाठी या मूल्यांचा उपयोग झाला. या मोहिमेत सामान्य लोकांचा सहभाग असला पाहिजे.

7. जीनाेम सिक्वेन्सिंगमध्ये गुंतवणूक गरजेची : आगामी काही आठवड्यात कोरोनाचा उपचार निश्चित करणे, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सरकारी आकडे संकलन करताना पारदर्शकता गरजेची आहे. आता जीनोम सिक्वेंसिंग, संस्थांची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणुकीची देखील गरज आहे.

8. नोकरी गमावणाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी: कोराेना काळात नोकरी गमावणाऱ्या लोकांना त्यातही मजूर व इतर लोकांना मदत दिली पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे राज्य अशा लोकांच्या खात्यात पैसा पाठवण्याची व्यवस्था करू शकतात. आर्थिक मदतीतून त्यांना उदरनिर्वाहाचा मार्ग सुकर करावा. त्यातून जोखीम कमी होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...