आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; In India Corona Cases And Deaths From COVID 19 Virus; News And Live Updates

कोरोनाचे संकट:उत्तरप्रदेशमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा; सक्रीय रुग्णांची संख्या 95 हजारांपार; दिल्लीतील हॉटेलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतरण

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या चोवीस तासांत देशात आढळले 1.85 लाख नवे रुग्ण

उत्तरप्रदेशात कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर कमतरता भासत आहे. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 95 हजारांपेक्षा जास्त झाली असून आरोग्य यंत्रनेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कोरोनावरील प्रभावी औषध म्हणून वापरलेल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनावरुन संपूर्ण देशात गोंधळ माजला आहे. सरकारने यावरील काळाबाजार रोखण्यासाठी बंदी घातली आहे. संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात याचा तुटवडा भासत आहे. याची पार्श्वभूमी लक्षात घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथून 25 हजार रेमडेसिवीर बोलावण्याचे आदेश दिले होते.

तर दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खूप मोठा पेच निर्माण झाला आहे. दिल्ली सरकारने सध्याची परिस्थिती लक्षात हॉटेल आणि हॉलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतरण करण्यास सांगितले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र चव्हाण यांनी राज्यात सध्यातरी बेड्स आणि व्हेंटिलेटरची कमतरता नसल्याचे सांगितले.

गेल्या चोवीस तासांत देशात आढळले 1.85 लाख नवे रुग्ण
शात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 1 लाख 85 हजार 104 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 1,026 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 82,231 रुग्ण उपचार घेत बरे झाले आहे. देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये 1 लाख 1 हजार 835 लोकांचा समावेश झाला आहे. गेल्या चोवीस तासांतील मृत्यूंचा आकडा हा पहिल्यांदाच सर्वात जास्त आला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी 1,281 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रत्येक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरी पण कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.

देशातील कोरोना महामारी आकडेवारीत

  • गेल्या 24 तासांतील एकूण नवीन प्रकरणे - 1.85 लाख
  • गेल्या 24 तासांतील एकूण मृत्यू - 1,026
  • गेल्या 24 तासांतील बरे झालेले रुग्ण - 82 हजार
  • गेल्या 24 तासांत उपचार घेणारे रुग्ण - 1.01 लाख
  • भारतात आतापर्यंत संक्रमित लोक - 13.87 कोटी
  • भारतात आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 1.23 कोटी
  • भारतातील आतापर्यंतचे मृत्यू - 1.72 लाख
  • भारतात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या - 13.60 लाख
बातम्या आणखी आहेत...