आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Outbreak Vaccine Latest Update; In India Corona Virus Cases And Deaths From COVID 19 Virus; News And Live Updates

कोरोना देशात:देशात 24 तासांत आढळले 1.85 लाख नवे रुग्ण, एक लाखांनी सक्रीय प्रकरणात वाढ; पहिल्यादांच एक दिवसांत 1 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • . देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये 1 लाख 1 हजार 835 लोकांचा समावेश झाला आहे.

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 1 लाख 85 हजार 104 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 1,026 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 82,231 रुग्ण उपचार घेत बरे झाले आहे. देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये 1 लाख 1 हजार 835 लोकांचा समावेश झाला आहे. गेल्या चोवीस तासांतील मृत्यूंचा आकडा हा पहिल्यांदाच सर्वात जास्त आला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी 1,281 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रत्येक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरी पण कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.

देशातील कोरोना महामारी आकडेवारीत

 • गेल्या 24 तासांतील एकूण नवीन प्रकरणे - 1.85 लाख
 • गेल्या 24 तासांतील एकूण मृत्यू - 1,026
 • गेल्या 24 तासांतील बरे झालेले रुग्ण - 82 हजार
 • गेल्या 24 तासांत उपचार घेणारे रुग्ण - 1.01 लाख
 • भारतात आतापर्यंत संक्रमित लोक - 13.87 कोटी
 • भारतात आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 1.23 कोटी
 • भारतातील आतापर्यंतचे मृत्यू - 1.72 लाख
 • भारतात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या - 13.60 लाख
बातम्या आणखी आहेत...