आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या दुसर्या लाटेबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना इशारा दिला आहे. केंद्राने मंगळवारी सांगितले की देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषत: काही राज्यांमध्ये ही एक मोठी समस्या आहे. सरकारने सांगितले की संपूर्ण देश हा धोक्यात आहे, म्हणून कोणीही दुर्लक्ष करू नये.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 पैकी 8 जिल्हे महाराष्ट्रातील असून दिल्लीचा जिल्हा म्हणून या यादीमध्ये समावेश असल्याचे सरकारने म्हटले आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, पुणे (59,475) , मुंबई (46,248), नागपूर (45,322), ठाणे (35,264), नाशिक (26,553), औरंगाबाद (21,282), बंगळुरु नगरीय (16,259), नांदेड (15,171), दिल्ली (8,032) आणि अहमदनगर (7,952) चा समावेश आहे. तांत्रिकदृष्या दिल्लीमध्ये अनेक जिल्हे आहेत, मात्र याला एका जिल्ह्याच्या रुपात घेतले आहे.
आरोग्य यंत्रणा कोसळण्याचा धोका आहेः पॉल
निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल म्हणाले की आपण विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धोकादायक परिस्थितीतून जात आहोत. परंतु संपूर्ण देश धोक्यात आला आहे, म्हणून आपल्याला व्हायरसची साखळी तोडण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करावे लागतील. रुग्णालय आणि ICU संबंधित तयारी कायम ठेवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. जर गोष्टी या वेगाने वाढत गेल्या तर आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल.
प्रकरणे वाढण्याचे मोठे कारण
महाराष्ट्र-पंजाबमध्ये पॉझिटिव्हिटी प्रमाणात वाढ
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत नवीन केसेस वाढल्या आहेत. या कालावधीत, सरासरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. तसेच काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. भारताचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर 5.65% आहे, तर या राज्यांचा यापेक्षआ जास्त आहे. महाराष्ट्रात 23..44%, पंजाबमध्ये 8.82%, छत्तीसगडमध्ये 8.24% आणि मध्य प्रदेशात7.82% दराने संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.
कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड ब्राझील आणि यूकेच्या व्हॅरिएंटवरही प्रभावी आहेत
केंद्र सरकारने सांगितले की, कोरोना संक्रमणाच्या धोकादायक ब्रिटेन आणि ब्राझिलियन व्हॅरिएंटच्या विरोधात कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड लस प्रभावी आहे. सरकारने पुढे सांगितले की, संक्रमणाच्या दक्षिण अफ्रीकी व्हॅरिएंटविषयी रिसर्च सुरू आहे. याचा रिजल्ट लवकरच समोर येतील.
आतापर्यंत 1.21 कोटी लोक संक्रमित
देशात गेल्या 24 तासांमध्ये 53,125 नवीन प्रकरणे आले. 41,217 रुग्ण बरे झाले आणि 355 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत जवळपास 1.21 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास 1.14 कोटी लोक बरे झाले आहेत. 1.62 लाख जणांनी जीव गमावला आहे. 5.49 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.