आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात गेल्या 15 दिवसांपासून 3 लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 4.12 लाख केस समोर आल्या आहेत. यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारांनी तयार केलेल्या मॉडेलनुसार दुसरा पीक येणार आहे आणि जून अखेरीस नवीन प्रकरणे दररोज 20 हजारांनी कमी होतील.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, IIT कानपूरच्या प्रोफेसर मनींद्र अग्रवाल यांनी एक मॉडल सादर केले आहे. याच्या आधारावर IIT हैदराबादचे प्रोफेसर एम. विद्यासागर म्हणाले की, काही दिवसांमध्ये पीक येणार आहे. आमचे प्रोजेक्शन म्हणतात की, जूनच्या अखेरपर्यंत देशातील परिस्थिती फेब्रुवारीसारखी होईल म्हणजेच आतापर्यंत रोज समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन 20 हजारांपर्यंत पोहोचेल. या टीमने गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत पीक येण्याचा अंदाज जाहीर केला होता, मात्र आता ते चुकीचे सिद्ध झाले आहे.
उपलब्ध ट्रेंटने एक्सपर्टच्या शंका वाढल्या, 5 पॉइंट्स
पीकविषयी अंदाज बांधणे अवघड, कारण - आकड्यांचे चित्र योग्य नाही
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पीकसाठी जे नवीन मॉडल अवलंबण्यात आले आहे, त्यावर जास्त विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. गेल्या महिन्यातही हे मॉडेल फेल झाले आहे. एक्सपर्ट म्हणतात की, हे आकडे कमी करुन सांगितले जात आहेत. टेस्टिंगही वाढवलेली नाही आणि मृतांची योग्य आकडेवारीही समोर आलेली नाही. तर देशभरात स्मशान घाटांचे फोटो काही तरी वेगळेच सांगत आहेत. यामुळे पीकबद्दलची सर्व मूल्यांकन जटिल होत आहे.
नवीन अंदाज इतर वैज्ञानिकांच्या अंदाजांशी जुळतो. ज्यामध्ये 15 मेच्या जवळपास दुसरा पीक येणार असल्याचे म्हटले जात आहे. हा अंदाज खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण गेल्या 24 तासांमध्ये देशात 4.12 लाख नवीन केस समोर आल्या आहेत. या दरम्यान 3,980 मृत्यू झाले. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की, ते नॅशनल लॉकडाऊन लावू इच्छित नाहीत. खरेतर जास्तीत जास्त राज्यात आंशिक किंवा पूर्ण लॉकडाऊन पहिल्यापासूनच लागू आहे. अनेक राज्यांनी आपल्या सीमा सील करुन ठेवल्या आहेत.
एक्सपर्टचे 4 अंदाज, जे चुकीचे सिद्ध झाले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.