आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Plasma Therapy Update; AIIMS ICMR Covid 19 National Task Force And The Health Ministry

एक्सप्लेनर:भारतात कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉलमधून प्लाज्मा थेरेपी वगळली, या थेरेपीचा कोणताच फायदा नव्हता का?

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • हा निर्णय द लँसेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित रिकव्हरी ट्रायलच्या परीणामांच्या आधारावर घेण्यात आला

सोशल मीडियावर प्लाज्मा डोनेट करणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही पुढे येऊन कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांना प्लाज्मा डोनेट करण्याचे आवाहन करत आहेत. जेणे करुन जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवता येऊ शकेल.

मात्र सोमवारी भारतात कॉन्वल्सेंट प्लाज्मा थेरीपी (CPT)ला कोविड-19 च्या नॅशनल क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमधून हटवण्यात आले आहे. AIIMS-ICMR कोविड-19 नॅशनल टास्क फोर्स आणि हेल्थ मिनिस्ट्रीच्या या निर्णावरुन वाटते की, प्लाज्मा थेरीपीचा रुग्णालयात दाखल रुग्णाच्या उपाचारामध्ये कोणताही फायदा नव्हता. हा निर्णय द लँसेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित रिकव्हरी ट्रायलच्या परीणामांच्या आधारावर घेण्यात आला आहे.

काय आहे प्लाज्मा थेरेपी?
कॉन्वल्सेंट प्लाज्मा थेरीपी एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये इन्फेक्शनने रिकव्हर झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त घेतले जाते. रक्ताचा पिवळा तरळ भाग काढला जातो. याला इन्फेक्टेड रुग्णाच्या शरीरात टाकले जाते. थ्योरीनुसार ज्या व्यक्तीने इन्फेक्शनशी लढा दिला आहे, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. या अँटीबॉडी रक्तासोबत जाऊन इन्फेक्टेड व्यक्तीच्या इम्यून सिस्टमला मजबूत करतात. यामुळे इन्फेक्टेड व्यक्तीचे गंभीर लक्षण कमजोर होतात आणि रुग्णाचा जीव वाचतो.

प्लाज्मावर आतापर्यंतचे संशोधन काय सांगते?

 • द लँसेटमध्ये प्रकाशित संशोधनानुसार कॉन्वल्सेंट प्लाज्मा थेरेपीमुळे मृत्यू रोखण्यामध्ये काहीच फायदा होत नव्हता. ही एक जटिल प्रक्रिया आहे आणि वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करते. याच्या तुलनेत जीव वाचवण्यात तेवढे यश मिळत नाही.
 • यापूर्वी चीन आणि नेदरलँडमध्येही प्लाज्मा थेरीपीविषयी अभ्यास झाला होता. यामध्येही प्लाज्मा थेरेपीमुळे गंभीर रुग्णांना काहीच फायदा झाल्याचे सिद्ध झाले नव्हते. यामुळेच अमेरिकेसह इतर देशांमध्येही प्लाज्मा थेरेपीला लाइफसेविंग मानले गेले नाही.
 • यापूर्वी भारताचे सर्वात मोठे ट्रायल PLACID मध्ये कोविड-19 रोखण्यात प्लाज्मा थेरीपीवर संशोधन करण्यात आले होते. अक्टोबर 2020 मध्ये प्रकाशित ICMR च्या संशोधनानुसार प्लाज्मा थेरेपीमुळे कोविड-19 चे गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना काहीच फायदा होत नाहीये.
 • तसेच WHO पासून कोणत्याच आंतरराष्ट्रीय पातळीच्या बॉडीने या थेरीपीची पुष्टी केलेली नाही. अमेरिकेमध्ये रेग्युलेटर US-FDA ने देखील या इमरजेंसी वापररासाठी परवानगी दिली होती, मात्र परीणामांची पुष्टी होऊ शकली नाही. म्हणजेच कोरोना रुग्णांवर हे उपचार यशस्वी ठरतील याची काहीच गॅरंटी नाही.

प्लाज्मा थेरेपी मृत्यूदर कमी करु शकते का?

 • नाही. खरेतर विशेषज्ञ आणि डॉक्टर या थेरीपीचा वापर इमरजेंसी म्हणून करत होते. दिल्लीचे HCMCT मणिपाल हॉस्पिटल द्वारकाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. देवेंद्र कुंद्रा यांनी म्हटले आहे की, जर कोरोनामुळे झालेल्या निमोनियाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्येच प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्यात आला तर रिकव्हरीमध्ये मदत मिळू शकते. मात्र जीव वाचवण्यात याचा कोणताही फायदा समोर आलेला नाही.
 • बँगलोरमध्ये नारायण हेल्थ सिटीमध्ये इंन्टेसिव्ह केअर-कंसल्टेंट डॉ. हरिश मल्लापूरा महेश्वरप्पा यांनी म्हटले आहे आहे की, गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांवर प्लाज्मा थेरेपीचा काहीच फायदा दिसत नाही. ही थेरेपी जीव वाचवण्यात फायदेशीर नाही. केवळ उपचाराचा वेळ कमी करणे आणि रिकव्हर लवकर करण्यास ही थेरेपी मदत करत आहे.
बातम्या आणखी आहेत...