आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Recovered Patients Vaccination; Modi Government On National Expert Group Recommendations

लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना:कोरोनातून बरे झाल्याच्या 3 महिन्यानंतर दिली जाणार लस, स्तनदा मातांनाही देता येणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॅक्सीनेशनपूर्वी कोणत्याही व्यक्तीला रॅपिड अँटीजन टेस्टची गरज नाही.

नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड (NEGVAC) च्या लसीकरणाविषयी नवीन शिफारशींना सरकारने मान्यता दिली आहे. यानुसार, कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या व्यक्तीला 3 महिन्यांनंतर लस डोस दिला जाऊ शकतो. यापूर्वी असे म्हटले होते की कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर एखाद्याच्या शरीरात 6 महिन्यांपर्यंत अँटीबॉडी असतात.

या व्यतिरिक्त मातांना लस देण्याची शिफारसही मान्य करण्यात आली आहे. आतापर्यंत गर्भवती आणि स्तनदा मातांना लस दिली जात नव्हती, कारण अशा महिलांना लसीच्या चाचण्यांमध्ये समाविष्ट केले नव्हते. त्यांच्यासाठी ही लस सुरक्षित आहे की नाही यावर संशोधन चालू होते. त्यांच्याकडे कोणताही सुरक्षा डेटा नव्हता. गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा निर्णय अद्याप झालेला नाही. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपसोबत यावर विचार केला जात आहे.

या 3 शिफारशींनाही मिळाली मान्यता

  • जर एखादी व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त असेल, त्याला हॉस्पिटलायझेशन किंवा आयसीयू आवश्यक असेल तर, त्याला लसीकरणासाठी 4-8 आठवडे थांबावे लागेल, ज्यानंतर त्यांना लस दिली जाईल.
  • लस मिळाल्यानंतर 14 दिवसांनंतर कोणीही व्यक्ती रक्तदान करू शकते. जर एखादी व्यक्ती कोविड पीडित आहे आणि 14 दिवसांनंतर त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली तर तो देखील ब्लड डोनेट करु शकतो.
  • व्हॅक्सीनेशनपूर्वी कोणत्याही व्यक्तीला रॅपिड अँटीजन टेस्टची गरज नाही.
  • आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या शिफारसींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्यास सांगितले व त्यांच्या पालनासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
  • स्थानिक लोकांना ही माहिती स्थानिक भाषेत पोहोचवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. प्रत्येक स्तरावर लसीकरणात गुंतलेल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...