आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Second Wave Cases In India; 23.02 Lakh New Patient In Seven Days, Its Lowest In Last 3 Weeks; News And Live Updates

दुसर्‍या लाटेत प्रथमच आठवड्यातील प्रकरणात कमी:देशात गेल्या 7 दिवसांत कोरोनाचे 23.02 लाख नवे रुग्ण, 3 आठवड्यांतील सर्वात कमी प्रकरणे; मृत्यूमुळे वाढली चिंता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शात रविवारी कोरोनाचे 2 लाख 81 हजार 683 नवीन रुग्ण आढळले

देशात कोरोना महामारीचा दुसर्‍या लाटेचा वेग कमी होताना दिसत आहे. कारण गेल्या 7 दिवसांत म्हणजेच 10 ते 16 मे दरम्यान, देशात 23.02 लाख नवीन रुग्ण आढळले आहे. हा आकडा गेल्या 3 आठवड्यांतील सर्वात कमी असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी देशात 26 एप्रिल ते 2 मे दरम्यान 26.13 लाख आणि 3-9 मे दरम्यान 27.42 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

एकीकडे कोरोनाचे प्रकरणे कमी होत आहे. तर दुसरीकडे मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे सरकारसह देशातील सर्वसामान्य लोक चिंतेत आहे. कारण देशात गेल्या आठवड्यात कोरोनामुळे 28 हजार 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची ही आकडेवारी जगातील एका आठवड्यातील सर्वात मोठी आहे. यापूर्वी अमेरिकेत 3-9 मे दरम्यान, 24 हजार 282 लोकांचा मृत्यू झाला होता.

24 तासांत 2.81 लाख नवीन प्रकरणे
देशात रविवारी कोरोनाचे 2 लाख 81 हजार 683 नवीन रुग्ण आढळले असून यात 4,092 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बातमी म्हणजे देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 78 हजार 388 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...