आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Second Wave Peak End India Update; Madhya Pradesh Maharashtra Uttar Pradesh Rajasthan Gujarat Chhattisgarh

देशातील कोरोनाचा वेग:24 दिवसांमध्ये रुग्णसंख्येत 63% घट; हाच ट्रेंड राहिल्यास 10 जूनपासून दररोज 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळतील

नवी दिल्ली | अभिषेक दीक्षित18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी चाचण्यांसह रुग्ण वाढले, नंतर कमी झाले

देशात कोरोनाची लाट हळु-हळू ओसरत आहे. कोरोनाच्या वेगाचा अंदाज यावरुन लावता येईल की, 1 मार्चला देशात 12,270 रुग्ण समोर आले होते. 67 दिवसानंतर 6 मे रोजी हा आकडा 34 पट वाढून 4.14 लाखांच्या पुढे पोहचला. ही तीचे वेळ होती, जेव्हा देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससाठी पळापळ सुरू होती. लोक रेमडेसिविरसारख्या औषधांसाठी दारोदारी भटकत होते.

यानंतर आता कोरोनाच्या घटत्या संख्येने लोक आणि सरकारला दिलासा दिला. विशेष म्हणजे, ज्या वेगाने रुग्ण वाढले होते, त्याच वेगाने आता कमी होत आहेत. 6 मे नंतर म्हणजेच, मागील 24 दिवसात दररोज मिळणाऱ्या रुग्णांमध्ये 63% घट झाली आहे.

कोरोनाच्या कमी होणाऱ्या ट्रेंडवर लक्ष्य दिल्यावर कळेल की, मागील अनेक दिवसांपासून दररोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 10 हजारांची घट होत आहे. जर हा ट्रेंड असाच राहिला,तर 10 जूननंतर रोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50 हजारांची घट होईल. यानंतर हा आकडा अजून कमी होऊ शकतो.

आधी चाचण्यांसह रुग्ण वाढले, नंतर कमी झाले
दुसऱ्या लाटेत सरकारने चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर नवीन संक्रमितांचा आकडाही वाढू लागला. एक मार्चला 7.59 लाख चाचण्या झाल्या आणि 12,270 संक्रमितांची नोंद झाली. यानंतर 31 मार्चला 11.25 लाख चाचण्या झाल्या आणि रुग्णही 72 हजार झाले. देशात सर्वात जास्त 4.14 लाख संक्रमित 6 मे रोजी आढळले होते.

पण, यानंतर सरकारने चाचण्या वाढवूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसली. देशात 25 मे रोजी सर्वात जास्त 22.17 लाख चाचण्या झाल्या आणि रुग्णसंख्या 2.08 लाख झाली. आता दररोज सरासरी दोन लाख चाचण्या रोज होत आहेत, पण नवीन संक्रमितांचा आकडा दोन लाखांपेक्षा कमी येत आहे.

बातम्या आणखी आहेत...