आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Second Wave Started In India From 15 February; SBI Research Team Report

कोरोनाविषयी भयावह दावा:भारतात 15 फेब्रुवारीपासून दुसरी लाट झाली सुरू; एप्रिल-मेमध्ये कोरोना उच्चस्तरावर जाईल, दरम्यान 25 लाख प्रकरणे येण्याची शक्यता

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मास्क आणि लसीकरण फार महत्वाचे आहे: ICMR

भारतात फेब्रुवारीपासून सलग कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. यानंतरपासूनच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या रिसर्च टीमच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, दुसरी लाट जवळपास 100 दिवसांपर्यंत राहिल. जर 15 फेब्रुवारीपासून याची सुरुवात झाली असे मानले तर मेपर्यंत या लाटेचा प्रभाव राहील. 23 मार्चच्या ट्रेंडला आधार मानले तर देशात दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास 25 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित होऊ शकतात.

SBI च्या 28 पानांच्या अहवालात असे म्हटले आहे की स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचा काही परिणाम होणार नाही. म्हणूनच, कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा एकमेव मार्ग आहे. जर आत्तापासून गणना केली गेली तर ते एप्रिलच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत कोरोना उच्चस्तरावर जाऊ शकतो. यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात कोरोना देशात उच्चस्तरावर होता. त्यावेळी दररोज 90 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत होती.

पुढील महिन्यापासून लॉकडाऊनचा प्रभाव दिसून येईल
आर्थिक निर्देशकांवर लक्ष केंद्रित करताना अहवालात म्हटले आहे की गेल्या आठवड्यापासून निर्देशांकात निरंतर घट नोंदली जात आहे. काही राज्यांमध्ये, अंशतः किंवा पूर्णपणे, खबरदारीकरीता लॉकडाउन सारखे उपाय करण्याचा परिणाम पुढील महिन्यापासून दिसून येईल.

लसीकरणाची गती वाढवण्याची आवश्यकता
राज्यांमधील लसीकरण प्रक्रियेस वेग देण्याची गरज असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत, लसीकरणाचा वेग दररोज 34 लाखांवरून 40-45 लाख पर्यंत वाढवला गेला तर 3 ते 4 महिन्यांत 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना संपूर्ण लसीकरण करता येईल.

मास्क आणि लसीकरण फार महत्वाचे आहे: ICMR
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी देशात गेल्या 5 महिन्यांत सर्वाधिक 53476 नवीन रुग्ण आढळले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशातील 18 राज्यात कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट सापडला आहे. ICMR चे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट वेळेपूर्वीच आली आहे. म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. अधिकाधिक चाचण्या केल्या जाव्या, मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच, लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे.

आतापर्यंत 1.17 कोटी संक्रमित
देशात आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 87 हजार 13 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 12 लाख 29 हजार 591 बरे झाले आहेत. तर 1.60 लाख रुग्णांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...