आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Situation India Update; Health Ministry Lav Agarwal On Manipur Kerala Tamil Nadu COVID Cases; News And Live Updates

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अडकला देश:तज्ज्ञांचा दावा - देशात प्रकरणे वाढत असल्यामुळे तिसरी लाट येणार; सरकार म्हणाले - अजून दुसरी लाटच संपलेली नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 जिल्ह्यांत 47 टक्के नवीन प्रकरणे

देशात सध्या कोरोनाची कोणती लाट सुरु आहे, यावरुन केंद्र सरकार आणि तज्ञांमध्ये मतभेद आहेत. कारण देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाची अजून दुसरीच लाट संपली नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे देशात कोणती लाट सुरु आहे हा प्रश्न जनतेला पडला आहे. एकीकडे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्व सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

केंद्र सरकारच्या मते, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि केरळसह 8 राज्यांत रिप्रोडक्टिव्ह नंबर एकपेक्षा जास्त झाला आहे. या नंबरमुळे त्या राज्यात किती प्रमाणात संक्रमणाचा फैलाव झाला आहे हे लक्षात येते. जर रिप्रोडक्टिव्ह नंबर एकपेक्षा जास्त असेल तर त्या राज्यात एक कोरोनाबाधित व्यक्ती एकपेक्षा जास्त लोकांना संक्रमित करत आहे.

18 जिल्ह्यांत 47 टक्के नवीन प्रकरणे
देशातील 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 24 जिल्ह्यांत 2 ऑगस्ट रोजी 10% पेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी दर पाहायला मिळाला आहे. केरळ, महाराष्ट्र, मणिपूरसह 6 राज्यांच्या 18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 आठवड्यांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ होत आहे. देशातील 47.5% प्रकरणे या जिल्ह्यांतून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही याचा अंदाजा येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचित लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.

सीरो सर्वेत चुकीची माहिती नाही
आयसीएमआरने केलेल्या सीरो सर्वेक्षणाच्या प्रश्नावर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, या सर्वेमुळे किती लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या. किती लोक कोरोनाबाधीत झाले, देशातील सध्याची परिस्थिती कव्हर करण्यासाठी हे सॅम्पल जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सीरो सर्वेत कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर तीन अंदाज

  • देशात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे. जर या व्हायरसच्या म्यूटेंटमध्ये बदल झाला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक समीरन पांडा यांनी केला होता.
  • आयआयटी हैदराबादचे मथुकुमाली विद्यासागर आणि आयआयटी कानपूरचे मनींद्र अग्रवाल यांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येणार असून ऑक्टोबरमध्ये याचे पहिले पिक येईल असे म्हटले होते.
  • संशोधकांच्या मते, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज 1 लाख नवीन रुग्ण आढळतील. जर परिस्थिती बिघडली तर दीड लाख नवे रुग्ण समोर येतील असा अंदाजा त्यांनी वर्तवला आहे.
बातम्या आणखी आहेत...