आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Testing Record India Update | COVID Second Wave Latest News And Updates

देशात कोरोनाच्या विक्रमी चाचण्या:शुक्रवारी विक्रमी 20.66 लाख टेस्ट करण्यात आल्या, हे जगात सर्वात जास्त; पॉझिटिव्हिटी रेटही कमी होऊन 12.5% वर आला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत एकूण 32.64 कोटी सँपल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी टेस्टिंगवर संपूर्णपणे भर दिला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून देशात दररोज 20 लाखांपेक्षा जास्त टेस्ट केल्या जात आहेत यावरुनच याचा अंदाज लावला जाऊ शकतो. गेल्या 24 तासांमध्ये देशात विक्रमी 20 लाख 66 हजार 285 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आल्या. हे केवळ भारतात नाही तर जगात एका दिवसात करण्यात आलेल्या टेस्टचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 20 मे रोजी 20 लाख 61 हजार 683 लोकांची कोरोना चाचणी झाली होती. देशात आतापर्यंत एकूण 32.64 कोटी सँपल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे जसजशी टेस्टिंग वाढवली जात आहे, तसतसे देशात पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असताना दिसत आहे. मे महिन्यात देशात सर्वात जास्त 24.8% पॉझिटिव्हिटी रेट 4 मे रोजी नोंदवण्यात आला होता. हा आकडा 21 मेला कमी होऊन 12.5% पर्यंत आला. म्हणजेच 4 मे रोजी देशात प्रत्येकी 100 टेस्ट केल्यास 25 कोरोना संक्रमित आढळत होते. हे सर्व आकडे 21 मे रोजी कमी होऊन 12-13 पर्यंत पोहोचले आहेत.

UP आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त टेस्टिंग
राज्यात टेस्टिंगच्या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशात सर्वात जास्त 4.6 कोटी टेस्टिंग करण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. येथे आतापर्यंत 3.2 कोटी टेस्ट करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये 2.9 कोटी आणि कर्नाटकात 2.8 कोटी सँपलिंग झाल्या आहेत. राजस्थानमध्ये हा आकडा एक कोटी आणि मध्यप्रदेशात 91.5 लाख आहे.

महाराष्ट्र-गोव्यात पॉझिटिव्हिटी रेट चिंतेचे कारण
देशात सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रात 18.4% आणि गोव्यात 17% आहे. अशा प्रकारे संक्रमणाचा दर केरळमध्ये 12.4%, चंदीगडमध्ये 12.1%, सिक्किममध्ये 11.6%, छत्तीसगडमध्ये 11.1%, पश्चिम बंगालमध्ये 10.4% आणि हिमाचल प्रदेशात 9.7% आहे.

काल 2.57 लाख केस
काल देशात 2 लाख 57 हजार 299 लोकांना कोरोनाची लागण झाली. हा आकडा गेल्या 35 दिवसांमध्ये सर्वात कमी आहे. यापूर्वी 16 एप्रिलला 2.34 लाख संक्रमित समोर आले होते. दिलासादायक बाब म्हणजे या दरम्यान 3 लाख 57 हजार 625 लोक बरेही झाले. तर दररोज होत असलेल्या मृतांचा आकडा पुन्हा 4 हजारांच्या पार गेला आहे. देशात शुक्रवारी 4,194 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला आहे.

बातम्या आणखी आहेत...