आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Testing Types | Diseased Antibody Antigen Testing; Know What Are The Different Types Of COVID Test?

कोरोनाची कोणती चाचणी कधी करावी ?:रॅपिड अँटीजन टेस्ट 20 मिनीटात कोरोनाची चाचणी करते, तर आरटी-पीसीआरला लागतात 12 तास

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॅपिड अँटीजन टेस्टची विश्वासहार्यता जवळ-जवळ 100% आहे

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.कोव्हिड-19 च्या चाचणीसाठी वेगवेगळ्या पद्धत वापरल्या जात आहेत. परंतू, अनेकांना या चाचण्यांमधील फरक माहित नाही. जाणून घ्या आरटी- पीसीआर, रॅपिड अँटीजन आणि ट्रू नेट टेस्टमधील फरक आणि त्या कधी कराव्यात.

1) आरटी- पीसीआर टेस्ट

काय आहे : कोरोना व्हायरसची चाचणी करण्याची एक पद्धत. यात व्हायरसच्या आरएनएचे परीक्षण केले जाते. आरएनए व्हायरसचे जेनेटिक मटीरियल आहे.

पद्धत कोणती आहे : नाक आणि गळ्यातून स्वॅब घेतले जातात. हा टेस्ट लॅबमध्येच केला जातो. याचा परिणाम यायला 12 ते 16 तास लागतात.

अॅक्यूरसी किती आहे : टेस्टिंगच्या या पद्धतीची अॅक्यूरसी 60% आहे. कोरोना संक्रमणानंतरही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकतो.

2) रॅपिड अँटीजन टेस्ट (रॅट)

काय आहे : कोरोना संक्रमणच्या व्हायरसचे परीक्षण केले जाते.

पद्धत कोणती आहे : नाकातून स्वॅब घेतला जातात. व्हायरसमधील अँटीजनची माहिती मिळते. याचा परिणाम फक्त 20 मिनिटात मिळतो.

अॅक्यूरेसी किती आहे : या टेस्टची अॅक्यूरसी जवळ-जवळ 100% आहे. परंतू, 30-40 % प्रकरणात ही चाचणी निगेटिव्ह येऊ शकते. अशा परिस्थिती आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते.

3) ट्रू नेट टेस्ट

काय आहे : ट्रू नेट मशीनद्वारे न्यूक्लिक एम्प्लीफाइड टेस्ट केली जाते. सध्या या मशीनद्वारे टीबी आणि एचआयवी संक्रमणाची माहिती मिळते. आता कोरोना चाचणीदेखील केली जात आहे.

पद्धत कोणती आहे : नाक किंवा गळ्यातून स्वॅब घेतले जाते. यात व्हायरसच्या न्यूक्लियिक मटीरियलला ब्रेक करुन डीएनए आणि आरएनएचे परिक्षण केले जाते. या चाचणीचा परिणाम तीन तासात येतो.

अँक्यूरसी किती आहे : 60 ते 70 % रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाची माहिती देतो.

4) अँटीबॉडी टेस्ट

काय आहे : यापूर्वी कधी कोरोना झाला की नाही, याची माहिती या चाचणीतून मिळते. संक्रमित व्यक्तीच्या शरिरात एका आठवड्यानंतर अँटीबॉडी तयार होतात.

पद्धत कोणती आहे : रक्ताच्या सँपलचे परिक्षण केले जाते. याचा परिणाम एका तासात मिळतो.

अँक्यूरसी किती आहे : कोरोना व्हायरस आहे की नाही, याची माहिती थेट मिळत नाही. फक्त शरिरात अँटीबॉडी आहेत का नाही, याची माहिती मिळते.