आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कोरोनाची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे. राघवन बुधवारी कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते.
5 राज्यात सर्वात जास्त मृत्यू
याच पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची प्रकरणे दररोज 2.4 टक्क्यांनी वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 प्रकरणे नोंदली गेली आहेत. 12 राज्यात एक लाखाहून अधिक, 7 राज्यात 50 हजार ते एक लाख आणि 17 राज्यांत 50 हजारांहून कमी सक्रिय प्रकरणे आहेत. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्ह स्तर 15% पेक्षा जास्त आहे. हे 10 राज्यात 5 ते 15% आणि तीन राज्यांत 5% पेक्षा कमी आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये अधिक मृत्यू होत आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या एका आठवड्यात जवळपास 1.49 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. चेन्नईमध्ये ही संख्या 38 हजार होती. काही जिल्ह्यात नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. यामध्ये कोझिकोड, एर्नाकुलम, गुडगाव यांचा समावेश आहे. 9 राज्यात 18+ लसीकरण सुरू झाले आहे. 18-44 वयोगटातील 6.71 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 16 कोटीहून अधिक डोस विनामूल्य दिले आहेत.
एप्रिल महिन्यात आली दुसरी लाट
पहिली लाट : देशात पहिली लाट गेल्या वर्षी आली होती. साडेतीन महिने केसेस वाढत राहिल्यानंतर पीक 16 सप्टेंबरला आला होता. त्या दिवशी 97 हजार 860 नवीन प्रकरणे नोंदली गेली. नंतर प्रकरणे कमी होऊ लागली होती. जवळपास दोन महिन्यांनंतर म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी ही प्रकरणे निम्म्याहून कमी 46 हजारांवर आली होती.
दुसरी लाट: मागील मार्चपासून याची सुरुवात झाली. 1 मार्च रोजी दिवसाला 12,270 प्रकरणे आढळली. यानंतर दररोज ही प्रकरणे वाढतच गेली. 1 एप्रिल रोजी एका दिवसात 75 हजार प्रकरणे नोंदली गेली. एका महिन्यानंतर, 30 एप्रिल रोजी एकाच दिवसात 4.02 लाख प्रकरणे आढळली. वेगवेगळ्या तज्ज्ञांचा अंदाज आहे की, या महिन्यात दुसऱ्या लाटेचा पीक दिसून येईल आणि पुढील महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.