आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Third Wave; ICMR Sero Survey Conducted In India's 70 Districts In June July And Included Children

प्राथमिक शाळा सुरू करण्याचा सल्ला:​​​​​​​तिसऱ्या लाटेपासून मुले सुरक्षित, 6 ते 17 वर्षांचे मुले संक्रमणाचा स्वतः सामना करु शकतात; ICMR च्या सर्व्हेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त बालकांमध्ये मिळाली अँटीबॉडी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 85% हेल्थ केअर वर्कर झाले संक्रमित

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंगळवारी 21 राज्यातील 70 जिल्ह्यांमध्ये जून-जुलै महिन्यात झालेल्या चौथ्या सिरो-सर्व्हेचा अहवाल जाहीर केला. अहवालानुसार, देशातील 67% लोकसंख्येत अँटीबॉडी विकसित केली गेली आहे. म्हणजेच, ही लोकसंख्या संक्रमित झाली आहे आणि व्हायरसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी या लोकांच्या शरीरात आवश्यक अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत.

चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये मोठ्या संख्येत मुलांचा समावेश आहे. यासह, शाळा सुरू करण्याच्या प्रश्नावर ICMR चे डायरेक्टर डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, शाळा उघडता येऊ शकतात, कारण लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याचा धोका प्रौढांपेक्षा कमी असतो. त्यांनी सांगितले की युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचे वाढते प्रकरण असूनही शाळा सुरू झाल्या आहेत. प्राथमिक शाळा सुरुवातीच्या टप्प्यात सुरू केल्या पाहिजेत, त्यानंतर माध्यमिक शाळा सुरू करता येतील, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दुसर्‍या लाटेतही मुलांवर परिणाम झाला
या सर्वेक्षणातील निकाल सांगताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोविड अँटीबॉडी देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये सापडल्या आहेत आणि अजूनही 40 कोटी लोकसंख्येस कोरोनाचा धोका आहे. सर्वेक्षणात समाविष्ट 6 ते 17 वर्षे वयोगटातील अर्ध्याहून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज देखील आढळली आहेत. म्हणजेच दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा परिणाम मुलांवरही झाला आहे.

डॉ. भार्गव म्हणाले, 'चौथ्या सेरो सर्वेक्षणात 6 ते 17 वर्षे वयोगटातील 28,975 लोकांचा समावेश होता. यामध्ये 6 ते 9 वर्षे वयोगटातील 2,892 मुले, 10 ते 17 वर्षे वयोगटातील 5,799 मुले आणि 18 वर्षांवरील 20,284 लोकांचा समावेश आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 62% लोकांनी लस घेतली नव्हती, तर 24% लोकांनी एक डोस तर 14% लोकांनी दोन्हीही डोस घेतले होते'

85% हेल्थ केअर वर्कर झाले संक्रमित
भार्गव म्हणाले की 85% आरोग्य सेवा कर्मचारी कोविड संक्रमित झाले आहेत. देशात कोरोनाची कमी होत असलेली प्रकरणे आणि लसीकरण होत असूनही, त्यांनी लोकांना कोविड नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देताना ते म्हणाले की ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशाच लोकांनी प्रवास करावा.

अँटिबॉडीविषयी चांगला अहवाल
सर्व्हेमध्ये सामिल 12,607 लोकांनी लस घेतलेली नव्हती. 5,038 असे होते ज्यांना एक डोस मिळाला आणि 2,631 ला दोन्ही डोस मिळाले होते. सर्वेक्षणात दोन्ही डोस घेणाऱ्या 89.8% जणांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. तर एक डोस घेणाऱ्या 81% जणांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. तर ज्यांनी लस घेतली नव्हती, अशा 62.3% लोकांमध्येच अँटीबॉडी आढळल्या.

सर्वेच्या चार मोठ्या गोष्टी

  1. 6 ते 9 वर्षांच्या 57.2% आणि 10 ते 17 वर्षांच्या 61.6% बालकांमध्ये अँटीबॉडी मिळाल्या.
  2. 18 ते 44 वर्षांच्या 66.7%, 45 ते 60 वर्षांच्या 77.6%, 60 वर्षांच्या वरच्या 76.7% मध्ये अँटीबॉडी मिळाल्या.
  3. 69.2% महिला आणि 65.8% पुरुषांमध्ये कोविडविरोधात अँटीबॉडी मिळाल्या.
  4. शहरी भागांमध्ये राहणाऱ्या 69.6% आणि ग्रामिण भागांमध्ये राहणाऱ्या 66.7% मध्ये अँटीबॉडी आढळल्या.
बातम्या आणखी आहेत...