आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Third Wave In India And Children; Why Modi Government, AIIMS Director Randeep Guleria On New COVID Impact On Kids; News And Live Updates

कोरोनाची सर्वात महत्वाची बातमी:जाणून घ्या तिसर्‍या लाटेची चर्चा कशी सुरू झाली? सरकार, एम्स आणि मुलांच्या डॉक्टरांनी याला नकार का दिला?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान म्हणाले- जिल्ह्यांतील मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा डेटा द्या.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि अनेक एनजीओ कोरोनाला रोखण्यासाठी काम करत आहे. देशात एकीकडे लसीकरणाची मोहीम सुरु झाली असून तरीदेखील कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रनेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण आलेले आहे. तर आता देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा जोर धरताना दिसत आहे. या लाटेचा लहान मुलांना जास्तीत जास्त धोका असल्याचे बोलले जात आहे.

देशातील माध्यमे, राज्य सरकारे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने देखील (एनसीपीसीआर) यासंदर्भांत आपली भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: 20 राज्यांच्या कलेक्टर्सना मुलांमध्ये असलेल्या कोरोनाशी संबंधित डेटा गोळा करण्यास सांगितले आहे.

परंतु, देशातील लहान मुलांच्या डॉक्टरांचे सर्वात मोठी संस्था असलेल्या आयएपी, नीति आयोगाचे सदस्य व्ही के पॉल आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या लाटेसंदर्भांत अद्याप कोणताच पुरावा नसल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागताना दिसत आहे. कारण एकीकडे सरकार तिसऱ्या लाटेची तयारी करायला सांगत आहे तर दुसरीकडे देशातील प्रमुख संस्था याबाबत अद्याप कोणताच पुरावा समोर न आल्याचे म्हणत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा नेमका कशी सुरु झाली हे आपण जाणून घेऊया...

प्रश्न : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चर्चा का व केव्हा झाली?

केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी 4 मे रोजी पत्रकार परिषदेत घेतली होती. दरम्यान, त्यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तेंव्हापासूनच देशात खऱ्या अर्थाने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या चर्चेला वेग आला होता.

प्रश्न : कोरोनाची तिसरी लाट केंव्हा येईल?
महामारीच्या बर्‍याच लाटांमध्ये प्रत्येक वेळी चढ उतार होणे हे स्वाभाविक आहे. कारण कोणतीही महामारी काळानुसार येते आणि संपते. एखाद्या वेळेस याचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढतो. परंतु, सध्याच्या काळात कितीही मोठ्या महामारीला लसीकरणामुळे आळा घालता येऊ शकतो. अशावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाट कधी येईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव कमी होताना दिसत आहे.

प्रश्न : तिसर्‍या लाटेचा जास्तच धोका असल्याचे कशावरुन सांगताहेत

1. देशात कोरोना महामारीची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा चार पटीने प्रभावी होती. त्यामुळे येणारी तिसरी लाट त्यापेक्षाही धोकादायक असू शकते अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.

2. भारतात लसीकरणाची मोहीम थंडावली असून आतापर्यंत देशातील 11% लोकांना पहिला तर 3.1% लोकांना दुसरा डोस दिला आहे.

प्रश्न : तिसऱ्या लाटेत मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडतील याचा संशोधन झाले नाही तरी इतकी चर्चा का?
कोरोना महामारीची तिसरी लाट लहान मुलांना जास्तच धोकादायक असल्याचे वारंवार समोर येत आहे. परंतु, अद्याप याबाबीत कोणताच प्रकारचा डेटा किंवा संशोधन झालेले नाहीये. तरीदेखील सरकार तयारी करायला सांगत आहे.

1. पंतप्रधान म्हणाले- जिल्ह्यांतील मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा डेटा द्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे रोजी झालेल्या बैठकीत 10 राज्यातील जिल्हाधिकारी (डीएम किंवा डीसी) आणि फील्ड अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांतील लहान मुले आणि तरुणांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याचा डेटा गोळा करण्यास सांगितले आहे.

2. कर्नाटक : सर्व जिल्ह्यांत विशेष कोविड केयर सेंटर
कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री ससिकाला जोले यांनी 18 मे रोजी राज्यातील 30 जिल्ह्यांतील मुलांसाठी खास कोविड केअर सेंटर तयार करण्याची घोषणा केली होती.

3. यूपी : 10 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांना प्रथम लस
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 मे रोजी संपूर्ण राज्यात एक जूनपासून 18+ चे लसीकरणाची घोषणा केली होती. परंतु, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 10 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांना प्रथम लस देण्यात येणार आहे.

4. दिल्ली : मुलांना वाचवण्यासाठी विशेष टास्क फोर्स
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 1 मे रोजी सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी सरकार तयारीत असून मुलांना वाचवण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...