आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Third Wave In India, ICMR Said Third Wave Of Corona In The Next Three Weeks, One Lakh Patients Will Be Found Daily; IIT K Professor Said India Near Herd Immunity, No Need To Fear; News And Live Updates

तिसऱ्या लाटेवर दुमत:आयसीएमआर म्हणे- कोरोनाची तिसरी लाट पुढील 3 आठवड्यात येईल, दररोज 1 लाख नवीन प्रकरणे येती; तर आयआयटीच्या मते- भारत हर्ड इम्युनिटीच्या दिशेने

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरुन देशातील दोन मोठ्या संस्थामधील वैज्ञानिकांमध्ये मोठा वाद सुरु झाला आहे. देशात येत्या तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) मुख्य वैज्ञानिक समीरन पांडा यांनी केला आहे. या लाटेत दररोज 1 लाख नवीन प्रकरणे येतील. जर या व्हायरसचे स्वरुप बदलेले तर परिस्थिती खूपच वाईट होईल असेही ते म्हणाले.

तर दुसरीकडे, आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणिंद्र अग्रवाल यांनी उलट विधान केले आहे. ते म्हणाले की, देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसून भारत हर्ड इम्युनिटीजवळ पोहोचला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जर कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती आधीसारखी नसेल असेही ते म्हणाले.

तिसरी लाट रोखण्यासाठी ICMR सल्ला

  • लोकांनी आतापासूनच लग्नाच्या कार्यक्रमात आणि पार्टीला जाणे टाळले पाहिजे.
  • मास्क आणि सॅनिटायझर्सचा नेहमीच वापर करावा.
  • विनाकारण बाहेर जाणे टाळा, अनावश्यकपणे फिरु नका.
  • जास्तीत जास्त लसीकरण करावे लागेल.

प्रोफेसरने 2 पॉईंटमध्ये दिली दिलासादायक बातमी

  • भारत देश हर्ड इम्युनिटीजवळ असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा भारताला जास्त धोका नाही.
  • डेल्टा व्हेरियंट दुसर्‍या लाटेच्या वेळी भारतात अस्तित्वात होता, म्हणून इथल्या लोकांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...