आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Third Wave India Update; 50 Innovative Modular Hospitals In Three Months

थर्ड वेवसाठी फास्ट ट्रॅक व्यवस्था:3 महिन्यात देशात 50 मॉड्यूलर रुग्णालये बनवली जातील, यामध्ये ICU आणि ऑक्सिजनची व्यवस्था असेल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता केंद्राने आरोग्याची पायाभूत सुविधा तत्काळ बळकट करण्याची योजना आखली आहे. पुढील तीन महिन्यात देशभरात 50 मॉड्यूलर रुग्णालये उभारण्याची केंद्राची योजना आहे. यामध्ये आयसीयू बेडसहित ऑक्सिजन सप्लायची व्यवस्था असेल. दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा ही सर्वात मोठी समस्या होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही मॉड्युलर रुग्णालये सध्या अस्तित्त्वात असलेल्या रुग्णालयांजवळच बनवली जातील. या माध्यमातून आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल.

खास बाब म्हणजे 3 कोटी खर्च करून बनवली जाणारी ही रुग्णालये 3 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत तयार केली जाऊ शकतात. यामध्ये आयसीयू, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर लाइफ सपोर्ट सिस्टम असतील. या मॉड्यूलर रुग्णालयांचे आयुष्य किमान 25 वर्षे आहे. आपत्तीच्या वेळी ही रुग्णालये एक आठवड्यात शिफ्ट केले जाऊ शकतात.

मॉड्यूलर हॉस्पिटलचे वैशिष्ट्य

  • 100 बेडचे रूग्णालय.
  • ICU साठी डेडिकेटेड झोन राहील.
  • अशी सरकारी रुग्णालये जिथे वीज, ऑक्सिजन आणि पाण्याची सोय असेल तिथेच हे बनवले जातील.
  • एका रुग्णालयासाठी 3 कोटी खर्च येईल आणि हे 3 आठवड्यात सुरु होईल.

या शहरांमध्ये बनवले जातील रुग्णालय
या योजनेंतर्गत छत्तीसगडमधील बिलासपूर, महाराष्ट्रातील पुणे, जालना, पंजाबमधील मोहाली येथे ही रुग्णालये बांधली जातील. याशिवाय छत्तीसगडच्या रायपूरमध्ये असे 20 बेडचे हॉस्पिटल बांधले जातील. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पहिल्या टप्प्यात, 20, 50 आणि 100 बेडचे बनवले जातील.