आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Third Wave; Pulse Oximeter, Blood Pressure Monitor And Other Medical Equipment Price Will Be Reduced

कोरोनात दिलासा:पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मामीटरसह 5 आवश्यक उपकरणांचे भाव होणार कमी, 70% नफ्याची लिमिट ठरली; 20 जुलैपासून लागू होणार नव्या किंमती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसर्‍या लाटेत मूलभूत चाचणी उपकरणांची मोठी कमतरता होती

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतांदरम्यान एक चांगली बातमी आहे. देशाच्या फार्मास्युटिकल प्राइसिंग रेग्युलेटरने (NPPA) पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर्स, नेब्युलायझर्स, डिजिटल थर्मामीटर, ग्लूकोमीटर यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे ट्रेड मार्जिन रेशेलायझेशन अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी, या सर्वांवरील वितरकाचे मार्जिन 70% इतके ठेवण्यात आले आहेत.

एनपीपीएने ट्विटमध्ये म्हटले आहे की या सर्व उपकरणांच्या सुधारित किंमती 20 जुलै 2021 पासून लागू होतील आणि 31 जानेवारी 2022 पर्यंत जारी राहतील. सध्या या पाचही उपकरणांमधील मार्जिन रेंज 3% ते 709% पर्यंत आहे.

दुसर्‍या लाटेत मूलभूत चाचणी उपकरणांची मोठी कमतरता होती
महामारीच्या दुसर्‍या लाटे दरम्यान, ऑक्सिजन आणि मूलभूत चाचणी उपकरणांच्या मागणीत अचानक वाढ झाली होती. हे मेडिकल स्टोअरमध्ये खूप महाग विकले गेले. त्या काळात रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या जास्त आणि आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे लोकांना साध्या चाचण्यांसाठीही अडचणींचा सामना करावा लागला होता. ऑक्सिजनपासून मूलभूत चाचणी उपकरणांपर्यंत देशात कमतरता निर्माण झाली होती. यामुळे त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

अनेक आवश्यक औषधांवर कर कमी झाला
गेल्या महिन्यातच, केंद्र सरकारने कोरोनाच्या उपचारांशी संबंधित 18 उत्पादनांची ड्युटी कमी केली होती. यात हँड सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, चाचणी किट, रुग्णवाहिका आणि थर्मामीटर इत्यादींचा समावेश आहे. हे सवलत दर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहतील. याव्यतिरिक्त, कोरोना उपचारात उपयोगी टोसिलिजुमॅब आणि ब्लॅक फंगसचे औषध एम्फोटेरिसिन बीवर जीएसटी दर 5% वरुन 0% कर देण्यात आला. यासोबतच रेमडेसिविर 12% ने कमी होऊन 5% करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...