आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Welcome 2021
  • Coronavirus; Top Trending Photos Of 2020 | Updated Most Viewed Photograph From First Images Of A Coronavirus To Donald Trump Acquitted & More Yearender 2020 News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 चे फोटो, ना विसरलो-ना विसरणार:आगीने 50 कोटी प्राणी मारले, कोरोनाने 17 लाख व्यक्ती हिसकावल्या; तरीही ना हरलो-ना हरणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या नावे ठरलेल्या 2020 या वर्षात कोरोनाने जवळपास 17 लाख लोकांचा मृत्यू झाला

वर्ष 2020... आपण या वर्षाची कधीच आठवण काढू इच्छिणार नाही. मात्र यावर्षाचे काही असे फोटोही आहेत, जे कधीच विसरता येणार नाहीत. प्रत्येक वर्षी प्रमाणे हे वर्ष देखील जगात आनंद घेऊन आले. मात्र हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. वुहानमधून आलेला कोरोना एक महामारी बनला आणि संपूर्ण जगाला विळखा घातला. कोरोनाच्या नावे ठरलेल्या 2020 या वर्षात कोरोनाने जवळपास 17 लाख लोकांचा मृत्यू झाला, जवळपास 8 कोटी लोक संक्रमित झाले, अनेक देशांमध्ये अर्थव्यवस्था ढासळली आणि लोकांची जीवन जगण्याची पध्दत पूर्णपणे बदलली.

जगभरात हे वर्ष कसे राहिले, कुठे काय चांगले झाले आणि कुठे काय वाईट घडले याचे काही फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

जानेवारी : आतिशबाजीने सुरुवात, कोरोना पसरला आणि ब्रायंट गेले

जल्लोषात पहिला दिवस

2020 चे स्वागत करण्यासाठी ब्राझीलचे शहर रियो डि जेनेरियोच्या कोपाकबाना बीचवर 20 लाखांपेक्षा जास्त लोक जमा झाले. मात्र वर्ष सरत असताना ब्राजीलमध्ये जवळपास 1 लाख 84 हजार लोकांचा मृत्यू झाला.

सुलेमानी यांची हत्या

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारलेले गेलेले ईरानी सैन्य कमांडर कासिम सुलेमारीन यांच्या अंत्य संस्कारात सामिल होण्यासाटी तेहरानमध्ये प्रचंड गर्दी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा होता की, सुलेमानी यांची नवी दिल्ली ते लंडनपर्यंतच्या दहशतवादी कारवाया रचण्यात भूमिका होती.

राख झाली

फिलीपिंसच्या बटंगस प्रांतमध्ये ताल ज्वालामुखीने राख आणि लावा फेकायला सुरुवात केली. 100km च्या परिसरात राखच राख पसरली आणि 40 लोकांचा मृत्यू झाला. या ज्वालामुखीने गेल्या 100 वर्षात 1500 लोकांचा जीव घेतला आहे.

चँपियनच्या मृत्यूने जग हादरले

पाच वेळा एनबीए चँपियन राहिलेल्या अमेरिकेच्या बास्केटबॉल प्लेअर कोबे ब्रांयट आणि त्यांची मुलगी गियाना मारिया यांचा हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. मनिलाच्या एका बास्केटबॉल कोर्टमध्ये कोबे यांच्या एका चाहत्याने त्यांची आणि त्यांच्या मुलीची ही पेंटिग काढत शोक व्यक्त केला.

आगीत राख झाले कोट्यावधी प्राणी

सप्टेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये पसरलेली आग जवळपास 8 महिने सुरू होती. यामध्ये 50 कोटींपेक्षा जास्त प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगमध्ये फसलेल्या कोआला वाचवताना फायर फायटरचा फोटो या भयावह घटनेचा पुरावा आहे.

कोरोनाशी लढले मॅन अँड मशीन

वुहानमधून पसरलेल्या कोरोनापासून निपटण्यासाठी चीनने 10 दिवसांमध्येच 1,500 बेड असणारे रुग्णालय उभे केले. हजारो लोकांनी शेकडो मशीनसोबत दिवसरात्र काम करत हे बनवले. काही दिवसातच वुहान कोरोना मुक्त घोषीत झाला.

फेब्रुवारी : महाभियोगातून मुक्त झाले ट्रम्प, चीनच्या बाहेर कोरोनामुळे पहिला मृत्यू
ट्रम्प झाले मुक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या खटल्यापासून वाचण्यात यशस्वी ठरले. दोन आठवड्यांच्या ट्रायलनंतर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसला बाधा पोहोचवण्याचे आरोप रद्द करण्यात आले. ट्रम्प यांनी भरसभेत ते वृत्तपत्र दाखवले ज्याची हेडलाइन अक्विटेड अशी होती.

ऑस्करमध्ये गैर-इंग्रजीची धूम

लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या ऑस्कर अवॉर्ड 2020 मध्ये दक्षिण कोरियाई चित्रपट निर्माते बोंग जून-हो फिल्म पॅरासाइटला ओरिजनल स्क्रीनप्ले, इंटरनॅशनल फीचर फिल्मसह 6 ऑस्कर अवॉर्ड मिळाले. बोंग जून-हो यांना गैर-इंग्रजी भाषेच्या चित्रपटासाठी बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला.

कोरोनामुळे चीनच्या बाहेर पहिला मृत्यू

चीनच्या बाहेर फिलीपींसमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. पब्लिक ट्रान्सपोर्टपासून प्रत्येक ठिकाणी कोरोनाचा प्रभाव दिसू लागला होता. यामुळे संपूर्ण देशात सॅनिटायजेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. तोपर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 300 लोकांचा मृत्यू झाला होता.

ट्रम्प यांचा स्वॅग

फ्लोरिडाच्या डेटोना बीचवर झालेल्या नास्कर कप सीरीजच्या कार रेसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प ग्रँड मार्शलच्या रुपात सामिल झाले. एअरफोर्स वनने पहिले ट्रॅकच्या आकाशात फेऱ्या घेतल्या. नंतर ट्रम्प यांच्या काफिल्याने रेसिंग ट्रॅकवर फेरी मारली.

कोरोनाशी लढण्याची तयारी

वुहानमध्ये कोरोना संक्रमित लोकांसाठी 1500 बेडचे अस्थाई हॉस्पिटल बनवण्यात आले. तोपर्यंत वुहानमध्ये 75 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमति झाले होते आणि चीनच्या बाहेर कोरोनाचे 150 प्रकरण समोर आले होते, फिलीपींसमध्ये एक मृत्यू झाला होता.

निवडणुकीच्या रिंगणात बायडेन यांची उडी

अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष होत असलेले बायडेन तोपर्यंत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवारर बनले होते. निवडणुकीच्या प्रचारावेळी बायडेन एका रेस्टॉरंटमध्ये रांगेत उभे राहून जेवण ऑर्डर करताना दिसले.

नमस्ते ट्रम्प

फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प तीन दिवसांच्या दौऱ्यावर आपल्या कुटुंबासह भारतात आले. या दरम्यान अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम झाला. ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासोबत साबरमती आश्रममध्ये चरखा चालवला.

मार्च : विदेशींसाठी बंद झाले मक्का, इटलीमध्ये झपाट्याने पसरला कोरोना

90 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हज सुने

सौदी अरबच्या स्थापनेच्या 90 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हज यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. इस्लामचे पवित्र शहर मक्का आणि मदीनाला विदेशींसाठी बंद करण्यात आली. प्रचंड गर्दी असणारा काबा पहिल्यांदाच रिकामा दिसला.

घरात बंद लोकांनी गायले 'Don't' Give Up'

इटलीमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन लागले. घरांमध्ये कैद लोक धैर्य वाढवण्यासाठी आपल्या बालकनीमध्ये गाणे गाऊ लागले. तोपर्यंत कोरोनामुळे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

पहिल्यांदा दर्शकांविना प्रेसिडेंशियल डिबेट

अमेरिकेत प्रेसिडेंशियल डिबेटच्या पहिल्या सेशनची वन ऑन वन डिबेटसाठी जोन बायडेन आणि सीनेटर बर्नी सँडर्स भेटले तेव्हा कोरोना व्हायरसमुळे हात मिळवता त्यांनी कोपर मिळवले. हि पहिलीच वेळ होती जेव्हा प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये प्रेक्षक नव्हते.

टोकयो ऑलिंपिक्स 2020 टळले

कोरोनामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनना 2020 टोकयो ऑलिंपिक्स एक वर्षासाठी टाळावे लागले. ओलिंपिक्सच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. सेकंड वर्ल्ड वॉरदरम्यान हे रद्द करण्यात आले होते.

भारतात जनता कर्फ्यू

भारतात कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउनपूर्वी 22 मार्चला जनता कर्फ्यू लावण्यात आला. पीएम मोदींच्या अपीलवर लोकांनी ताट, शंख, घंटी आणि टाळ्या वाजवून आपात्कालीन सेवा देणाऱ्यांचे आभार मानले. मुंबईच्या एका चाळीत असा नजारा दिसला.

डिज्नीचे जगही सुने

अमेरिकेत फ्लोरिडाच्या ओरलँडोमध्ये बनलेल्या डिज्नी मॅजिन किंगडम थीम पार्कचा लॉकडाउन सुनेदरम्यान ड्रोनने हा फोटो घेण्यात आला. कोरोनामुळे पहिल्यांदाच डिज्नी पार्कमध्ये अशाप्रकारे सन्नाटा होता.

एप्रिल :सामूहिक मृतदेह दफन करण्याचा काळ, मनुष्य घरात बंद आणि रस्त्यांवर जनावरे

सामूहिक मृतदेह दफन करण्याचा काळ

अमेरिकेत सतत वाढत्या मृत्यूंच्या काळात न्यूयॉर्क हार्ट आयलँडमध्ये सामूहिक रुपात मृतदेह दफन करण्याचे फोटो समोर आले. या वेळपर्यंत न्यूयॉर्कमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाख 60 हजार आणि आठ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

छतावर रमजानची नमाज

श्रीलंकेत कोरोनामुळे रमजानमध्ये मशीदींमध्ये नमाज पठण करण्यास बंदी होती. लोकांना आपले छत आणि अंगणांमध्ये नमाज पढण करण्यास सांगण्यात आले होते. एप्रिलमध्ये येथे कोरोनाचे 295 प्रकरणे समोर आली आणि सात लोकांचा मृत्यू झाला होता.

यमराज बनले कोरोना

दिल्लीमध्ये स्थानिक कलाकार यमराजच्या वेशभूषेत रस्त्यावर निघून लोकांना कोरोनाप्रति जागरुक करताना दिसले आणि लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत देशभरात 20471 लोक संक्रमित आणि 652 लोकांचा मृत्यू झाला होता.

अंतर नाही पण मास्क आवश्यक

अल सल्वाडोरची राजधानी सॅन सल्वाडोरच्या तुरुंगात झालेल्या दंगलींमध्ये 50 पेक्षा जास्त लोक मारले गेले. राष्ट्रपती नायिब बुकेले म्हणाले की, कोरोनाला आडून अपराधी गँग असे करत आहे. तुरुंगात अशा अंदाजात कैद्यांची तलाशी घेण्यात आली.

आपल्या लोकांच्या स्पर्शासाठी तरसले

कोरोनामुळे जगभरातील आरोग्य कर्मचारी आपल्या घर-कुटुंबासून दूर होते. न्यूयॉर्कमध्ये एक आरोग्य कर्मचारी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आरश्याच्या पलीकडे उभी राहून आपल्या मुलीला भेटली. जगातील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांचेही हेच हाल होते.

घरात बंद मनुष्य, रस्त्यावर जनावर

लॉकडाउनमुळे लोक आपल्या घरात बंद होते आणि जंगली प्राणी मानवी परिसरात उतरले होते. ब्रिटेनच्या एका मानवी परिसरात अनेक हरणी फिरताना दिसल्या. ज्यांना पाहून एक व्यक्ती आपल्या घराच्या बाहेर आली आणि त्यांना काही खाऊ घातले.

मे : पाकिस्तानमध्ये झाले प्लेन क्रॅश, खेळाच्या मैदानात कटआउट बनले प्रेक्षक

रोजा सोडताना लोक

मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानमध्ये सीरियाच्या अल अतरिबमध्ये लोक मलब्यामध्ये एकत्र जमीनीवर बसून रोजा सोडताना दिसले. एका सैन्य अभियानादरम्यान त्यांचे घर आणि जवळपासचा संपूर्ण परिसर पूर्णपणे उद्धवस्त झाला होता.

पाकिस्तानात प्लेन क्रॅश

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक पॅसेंजर प्लेन कराची एअरपोर्टजवळ मानवी वस्तीत क्रॅश झाले. या दुर्घटनेत नऊ मुलांसह 97 लोकांचा मृत्यू झाला. प्लेन 15 घरांना नुकसान पोहोचवत क्रॅश झाले. ज्यामध्ये घरांना आग लागली.

कटआउट बनले प्रेक्षक

कोरोनामुळे दक्षिण कोरियात बंद झालेले खेळ बंद दाराआड सुरू झाले होते. मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांना येण्यास मनाई होती. यामुळे बेसबॉल मॅचदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या जागी कटआउट ठेवण्यात आले होते.

जून : ब्राझीलमध्ये कमी पडले कब्रिस्तान, अमेरेकेत सुरू झाल्या निवडणूक रॅली

कृष्णवर्णियांचा द्वेष

अमेरिकेत कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात गदारोळ माजला. कृष्णवर्णिय चारही बाजूंनी सरकारच्या विरोधात प्रदर्शन करत होते. अशाच एका प्रदर्शनादरम्यान एका श्वेत जोडप्याने कॅमेरा घेतलेल्या कृष्णवर्णियांवर बंदूक उगारली.

कोरोनापुढे कब्रिस्तानही छोटे पडले

ब्राझीलच्या मनौसमध्ये एका कब्रिनस्तानची स्थिती. तोपर्यंत देशात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. देशभरात रोज 100 लोक मृत्यूमुखी पडत होते.

ट्रूडोंकडून कृष्णवर्णियांचे समर्थन

अमेरिकेत सुरू असलेल्या कृष्णवर्णियांच्या आंदोलनाचे समर्थन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले. कॅनडाच्या संसदेसमोर हजारो लोकांच्या गर्दीमध्ये ट्रुडो यांनी गुडघे टेकवून जातीयवादी हल्ल्याचा विरोध केला होता.

रोपे बनली दर्शक

स्पेनच्या बार्सिलोनामध्ये लॉकडाऊननंतर पहिल्यांदा बार ओपेरा राउस उघडण्यात आले. मात्र प्रेक्षकांना बोलावण्याची परवानगी नव्हती. 2292 सीट असणाऱ्या ओपेरा हाउसमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी लोकांच्या जागेवर प्रत्येक सीटवर रोपे ठेवण्यात आली.

ट्रम्प यांची पहिली रॅली रिकामी

कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीची रॅली सुरू केली होती. तुलसा, ओकलहोमाच्या बीओके सेंटर ऑडिटोरियममध्ये झालेल्या या रॅलीमध्ये केवळ 6 हजार लोक पोहोचले. तर या रॅलीत लाखो लोक पोहोचतात असा दावा होता.

जुलै: थायलँडमध्ये उघडल्या शाळा, नासाने घेतले मंगळ उड्डाण
जग घरात बंद, चीनमध्ये थियेटर उघडले

चीनच्या अनेक भागांमध्ये थियेटर उघडण्यात आले. मात्र एका वेळी केवळ 30 टक्के प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची परवानगी होती. मात्र जगातील जास्तीत जास्त देशांमध्ये लॉकडाऊन लागला होता आणि कोरोना झपाट्याने पसरत होता.

हुकुमशाहचा थाट

उत्तर कोरियाई सरकारने आपल्या सैन्याची ताकद दाखवण्यासाठी एक फोटो जारी केला होता. ज्यामध्ये किम जोंग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यभागी बसले होते, जे आपल्या हातात पिस्तुल घेऊन आहेत. ही पिस्तुल त्यांना किम यांनी दिली होती.

नासाची मंगळ उड्डाण

अमेरिकी अंतराळ संघटना नासाचे मिशन MARS2020 फ्लोरिडाच्या केप कनेवरलमध्ये कॅनेडी स्पेस सेंटरमधून लॉन्च करण्यात आला. या मिशनमध्ये PERSERVERANCE रोवरला मंगळावर पाठवण्यात आले. या रोवरमध्ये 25 कॅमेरे, माइक, ड्रिल आणि लेजर लावले होते.

क्लासरुममध्ये आपापले रुम

जुलैमध्ये जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउनमध्ये शिथिलता देऊ लागले. थायलँडमध्ये तीन महिन्यानंतर शाळा उघडल्या आणि शाळेत मुलांसाठी खास डेस्क तयार करण्यात आला. या डेस्कमध्ये मुलांना चारही बाजूने डब्ब्यासारखी वॉल बनवण्यात आली.

बॅक्टेरियाने मारले 350 हत्ती

अफ्रिकन देश बोत्सवानामध्ये जलाशयांच्या आजुबाजूला 60 दिवसात 350 हत्तींनी प्राण गमावले. वैज्ञानिकांनुसार पाण्यात विषारी सायनो बॅक्टेरियामुळे या हत्तींचा मृत्यू झाला. हे बॅक्टेरिया ग्लोबल वार्मिंगमुळे तेजीने वाढतात.

हिरोशिमामध्ये पूर

जापानच्या दक्षिणी परिसरात आलेल्या पुरामुळे जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला. या पुरामुळे सर्वात जास्त मृत्यू हिरोशिमामध्ये झाले. क्यूशी द्वीपवर प्रचंड पावसामुळे कुमामोटो आणि कगोशिमा प्रांतात सर्वात जास्त नुकसान झाले.

सरकारने मनाई केली तर खासगी निवडणूक

हाँग काँगमध्ये यावर्षी होणाऱ्या लेजिस्लेटिव्ह काउंसिल निवडणुका एक वर्षासाठी टाळण्यात आल्या. मात्र लोकशाही समर्थकांनी एक अनाधिकारिक प्रायमरी निवडणुकांचे आयोजन केले ज्यामध्ये सहा लाख लोकांनी मते दिली.

कोरोना वॉरियर्ससाठी आव्हान बनले पीपीई कीट

दिवस रात्र काम करत असलेल्या कोरोना योद्धांसाठी पीपीई किट या भीषण गर्दीमध्ये अडचणीपेक्षा कमी नव्हते. विना एसीमध्ये हे घातल्यास दोन तासात कपडे भिजून जात होते. घामाने भिजलेल्या आरोग्य कर्चाऱ्याचा हा अहमदाबादमधील फोटो.

ऑगस्ट : बेरुत ब्लासने घेतला 204 लोकांचा बळी, वुहानमध्ये पूल पार्टी

बेरुत ब्लास्ट

लेबनानची राजधानी बेरुतमध्ये ब्लास्ट झाला. पोर्ट परिसराच्या एका वेयरहाउसमध्ये ठेवलेल्या 2750 टन अमोनियम नायट्रेटमुळे येथे चार स्फोट झाले. यामध्ये 204 लोकांचा मृत्यू झाला. 6500 लोक जखमी झाली. 1 लाख 11 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले.

P12 फूट अंतरावरुन डिबेट

डेमोक्रेट पक्षामधून उपराष्ट्राध्यक्षच्या पदावर कमला हॅरिस यांना निवडण्यात आले होते. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि कमला हॅरिस यांच्यात डिबेट झालली तर दोन कँडिटेट्ससमोर प्रोटेक्शन ग्लासेस लावण्यात आले होते. यामुळे दोघांमध्ये 12 फूट अंतर राहिले.

वुहान ऑगस्टमध्ये मस्त

ना मास्क, ना सोशल डिस्टेसिंग... हा वुहानचा नजारा आहे. येथून कोरोनाची सुरुवात झाली होती. येथे लोक पूल पार्टी करताना दिसले. आठ एप्रिलला येथे लॉकडाऊन हटवण्यात आले. तोपर्यंत जगात 1,95,920 लोकांचा मृत्यू झाला होता.

वादळाने विमानही उडवले

अमेरिकेच्या लुइसियाना आणि टेक्सासमध्ये जबरदस्त वादळ आले होते. लुइसियानामध्ये जवळपास 164 वर्षांनंतर एवढे मोठे वादळ आले. ज्यामुळे 70 लोकांचा मृत्यू झाला. वादळाने जमिनीवर उभे विमानाचे परखच्चे उडाले.

आबे यांचा राजीनामा

जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आरोग्याच्या कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोरोना व्हायरस योग्य प्रकारे न हाताळल्यानेही त्यांची लोकप्रियता 30 टक्के कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी पीएम हाउस सोडले होते.

बेरुत स्फोटाने लेबनान सरकार हादरले

लेबनानची राजधानी बेरुतच्या बंदरगारमध्ये झालेल्या जबरदस्त विस्फोटाचा परिणाम सरकारपर्यंत पोहोचला. सरकारच्या निष्काळजीपणाने त्रस्त असलेले लोक आंदोलन करु लागले. जनतेने पोलिस अधिकाऱ्यासमोर आतिशबाजी करत प्रतिकात्मक ब्लास्ट केला.

सप्टेंबर : अमेरिकेत नारंगी झाले आकाश, ग्रीसमध्ये बघर झाले हजारो प्रवासी

दरिया पार आगच आग

अमेरिकेमध्ये ओरेगॉन, कॅलिफॉर्निया आणि वॉशिंगटनच्या जंगलांमध्ये भीषण आग पसरली. 9 लाख एकरचा परिसर खाक झाला आणि शेकडो पशु-पक्षी भस्म झाले. यामुळे कॅलिफॉर्नियाचे प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज नारंगी धुरामध्ये घेरलेला दिसला.

महिला जजला श्रद्धांजली

अमेरिकेची सुप्रीम कोर्टाची दुसरी महिला जज रुथ बदर गिंस्बर्गचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी महिला आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकाऱ्यांसाठी अनेक कामे केली. त्यांच्या निधनावर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर लोक त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जमा झाले.

राजकारणाच्या आगीने केले बेघर

ग्रीसमध्ये लेसबॉस द्वीपच्या सीरियाई प्रवासी कँपमध्ये आग लागली. 13 हजार प्रवासी बेघर झाले. हजारो लोक आपल्या मुलांना घेऊन दुसऱ्या कँपकडे निघाले.

अक्टोबर : कोरोना पॉझिटिव्ह निघाले ट्रम्प, लंडन मॅराथनमध्ये एलिजाबेथ यांचे कटआउट

ट्रम्प यांना कोरोना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घोषणा केली. ते रुग्णालयात दाखल झाले. यामुळे बायडेन यांच्यासोबत दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट झाली नाही. ट्रम्प यांनी ऑनलाइन डिबेट करण्यासही नकार दिला.

मॅराथनमध्ये महाराणीचे कटआउट

कोरोनामुळे टळलेली लंडन मॅराथन अक्टोबरमध्ये झाली. मॅराथनमध्ये प्रेक्षकांना येण्याची परवानगी नव्हती. यामुळे ब्रिटेनची महाराणी एलिजाबेथही पोहोचल्या नाहीत. मैदानात त्यांचा कटआउट लावण्यात आला.

दोन फूट अंतर आवश्यक

अमेरिकेच्या निवडणुकांदरम्यान मियामी एअरपोर्टवर डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडेन पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरले. बायडेन यांच्या पत्नी जिल यांनी त्यांना मागे ओढत सोशल डिस्टेसिंगकडे लक्ष देण्यास सांगितले.

लोकशाहीसाठी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पोस्टल वोटिंग सुरू झाली होती. लुइसियानामध्ये एक महिला आपल्या मुलांसोबत मत टाकण्यासाठी पोहोचली. नियमानुसार मुलांना मास्क लावला जाऊ शकत नाही यामुळे त्यांनी इनोव्हेटिव्ह पध्दतीचा वापर केला.

मोठ्यांच्या युद्धात गेला मुलांचा जीव

अजरबैजानच्या पश्चिमी शहर गांजामध्ये एक मानव वस्तीतील इमारतीवर अर्मेनियाई रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात सात लोकांचा मृत्यू झाला आणि 33 जखमी झाले. हल्ल्यात एका वडिलांनी आपल्या 10 महिन्यांची चिमुकली गमावली.

ट्रम्प यांनी मास्क काढून फेकले

कोरोना संक्रमित डोनाल्ड ट्रम्प तीन रात्र रुग्णालयात राहून परत आले. दहा दिवसांनंतर फ्लोरिडाच्या सॅनफोर्ड रॅलीमध्ये पोहोचले. रॅलीमध्ये आपल्या भाषणापूर्वी ट्रम्प यांनी आपला मास्क काढून फेकून दिला. याची जगभरात निंदा झाली.

नोव्हेंबर : बायडेनने मारली बाजी, कोरोनाच्या भीतीने डेनमार्कने मारले दीड कोटी मिंक

अमेरिकेत बॅलेटची गणना

​​​​​​​

कोरोना काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी मदतान झाल्यानंतर मतांची गणना सुरू झाली. जास्तीत जास्त अमेरिकन राज्य इलेक्ट्रॉनिक सिस्टमवर विश्वास ठेवत नाहीत. यामुळे तेथे बॅलेटने वोटिंग होते.

बायडेन-कमला यांच्या जोडीने ट्रम्प यांना हरवले

2020 ची अमेरिकेची निवडणूक अविस्मरणीय ठरली. ट्रम्प यांना हरवून बायडेन प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले आणि कमला हॅरिस व्हाइस प्रेसिडेंट. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे. तसेच पहिल्या अश्वेत आणि भारतीय वंशाच्या महिला आहेत.

अमेरिकेतही शाळा उघडल्या

अमेरिकाच्या मार्यलँडमध्ये लॉकडाउननंतर शाळा पुन्हा उघडल्या. शाळांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचा विचार करुन मुलांना बसण्यासाठी खास सुविधा करण्यात आली. कोरोना व्हायरसमुळे येथे पाच हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले.

व्हेलने वाचवली रेल्वे

नीदरलँडच्या रोटेरडॅममधध्ये एक मेट्रो अनियंत्रित होऊन बॅरियर तोडत जमीनीपासून 25 फूट उंच हवेत लटकली. ट्रेन रोटेरडॅममध्ये बनलेल्या एका विशाल व्हेल मशाच्या कलाकृतीला टक्कर घेऊन हवेत लटकली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

मनुष्यांना वाचवण्यासाठी प्राण्यांचा बळी

कोरोना फक्त मनुष्य नाही तर प्राण्यांवरही संकट म्हणून आले. डेनमार्कने दिड कोटी मिंकलला कोरोना पसरण्याच्या शंकेने मारले. हा मिंकपासून मिळाणाऱ्या फरांचा सर्वात मोठा निर्यातक देश आहे.

रशियामध्येही असे मिळते नेटवर्क

रशियाचे एक गाव स्टनकेविचमध्ये एक विद्यार्थी चांगल्या इंटरनेटसाठी झाडावर चढला. त्याला ऑनलाइन क्लास घ्यायचा होता. कोरोनामुळे रशियात दिर्घकाळापासून शाळा-कॉलेज बंद आहेत. रशियामध्ये कोरोनामुळे 29 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत.

डिसेंबर : कोरोनाची पहिली व्हॅक्सीन दिली, सेंटा देखील झाले ऑनलाइन

कोरोनाची पहिली लस

जगात सर्वात अगोदर ब्रिटनमध्ये फायजर कंपनीची कोरोना व्हॅक्सीन देण्यास सुरुवात झाली. मध्य ब्रिटनच्या कोवेंट्री येथील यूनिव्हर्सिटी रुग्णालयात उत्तरी आयरलँडच्या 90 वर्षीय महिला मारग्रेट कीनान यांना पहिली फायजर/बायो-एन-टेकची कोव्हिड व्हॅक्सीन देण्यात आली.

सेंटाचे कोरोना कवच

कोरोना काळात क्रिसमसही नवीन पध्दतीने साजरा केला जाईल. सेंटा सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत सर्वांना भेटतील. याची एक झकल डेनमार्कमध्ये बघायला मिळाली. जेथे सेंटाला प्लास्टिकच्या बबलमध्ये बसवण्यात आले होते.

ऑनलाइन सेंटा

​​​​​​​

लंडनच्या मिनिस्ट्री ऑफ फन सेंटा स्कूलमध्ये ऑनलाइन अॅपसाठी सेंटा क्लॉजची ट्रेनिंग झाली. यावेळी कोरोनामुळे सेंटा घरोघरी जाऊन मुलांना भेटणार नाही. यामुळे खास अॅपच्या माध्यमातून क्रिसमसला सेंटा क्लॉज मुलांना ऑनलाइन भेटतील.

मंगळ अजून दूर

स्पेसएक्सचे स्टारशिप रॉकेट टेस्ट लॉन्चदरम्यान टेक्सासच्या तटावर भयानक विस्फोटानंतर ज्वालांमध्ये बदलले. स्पेसएक्सचे मालक एलन मस्क मंगळ ग्रहापर्यंत मनुष्याला पोहोचवण्याच्या मिशनमध्ये व्यस्त आहेत. या दुर्घटनेने या मिशनला मोठा धक्का बसला.

बातम्या आणखी आहेत...