आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Transmission Advisory Latest News; Droplets Emitted By An Infected Person Land On Various Surface

हवेत 10 मीटरपर्यंत पसरु शकतो कोरोना:कोरोना संक्रमणावर सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना, ड्रॉपलेटच्या 5 पट अधिक दूरपर्यंत पसरतो एयरोसोल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हेटिंलेशन चांगले असेल तर संक्रमण पसरण्याचा धोका कमी

कोरोना संक्रमित व्यक्तीचे एयरोसोल 10 मीटर अंतरापर्यंत पसरु शकतात. तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत जातात. सरकारने गुरुवारी नवीन अॅडवायजरी जारी करत कोरोनापासून बचावासाठी नवीन मार्गदर्शक सूचना सांगितल्या आहेत. मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतात ते देखील संसर्ग पसरवू शकतात. म्हणूनच लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे.

व्हेटिंलेशन चांगले असेल तर संक्रमण पसरण्याचा धोका कमी
सरकारकडून स्टॉप द ट्रान्समिशन, क्रश द पेन्डेमिकच्या नावाने जारी केलेल्या डॉक्यूमेंट्समध्ये विशेषतः व्हेंटिलेशनच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ज्या ठिकाणांवर व्हेंटिलेशनची चांगली सुविधा असते, तेथे एखाद्या संक्रमितामुळे दुसऱ्याला संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. यासोबचत असे म्हटले आहे की, दरवाजे-खिडकी बंद ठेवून AC सुरू ठेवल्याने खोलीमध्ये संक्रमित हवा जमा होते आणि दुसऱ्या लोकांना संक्रमणाचा धोका वाढतो.

सरकारने म्हटले आहे की, संक्रमित व्यक्तीच्या नाकातून ड्रॉपलेट्स आणि एअरोसोलच्या रुपात निघणाऱ्या सलिवा आणि डिस्चार्ज संक्रमण पसरवण्याचे प्राथमिक कारण असते. मात्र त्या ठिकाणी हवा खेळती असेल तर संक्रमणाचा धोका कमी होतो.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या डॉक्यूमेंटसमध्येही सांगण्यात आले आहे की, संक्रमितांचे ड्रॉपलेट्स वेगवेगळ्या पृष्ठभागांवर दिर्घकाळ राहतात. यामुळे दरवाजे, हँडल, लाइटचे स्विच, टेबल-खुर्ची आणि फर्शीला ब्लीच आणि फिनाइल सारख्या डिसइन्फेक्टेंट्सने स्वच्छ करत राहा.

डबल लेअर मास्क घालण्याचा सल्ला
सरकारने म्हटले आहे की, लोकांना डबल लेअर किंवा N95 मास्क घातला पाहिजे. हे जास्तीत जास्त बचाव करतात. जर डबल मास्क घालत असाल तर पहिले सर्जिकल मास्क घाला, नंतर त्याच्यावर टाइट फिटिंगचे कापडाचे मास्क घाला. जर कुणाजवळ सर्जिकल मास्क नसेल तर ते कॉटनचे 2 मास्क घालू शकतात.

सर्जिकल मास्कचा वापर तसा तर एकदाच करावा. मात्र 2 मास्क घालत असाल तर सर्जिकल मास्क 5 वेळाही वापरू शकता. प्रत्येक वेळी वापरानंतर हे 7 दिवस कोरड्या ठिकाणी सूर्य प्रकाशात ठेवा.

आरोग्य कर्मचाऱ्यांना टेस्टिंगची ट्रेनिंग देण्यात यावी
तुमच्या परीसरातील लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करुन घ्या. आशा वर्कर, आंगनवाडी कार्यकर्ता किंवा दुसऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याची ट्रेनिंग अवश्य देण्यात यावी. या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्टिफाइट N95 मास्क उपलब्ध करुन द्यावे. त्यांनी लस घेतलेली असेल तरीही त्यांना हे मास्क देण्यात यावेत. त्यांना ऑक्सीमीटरही देण्यात यावे, जेणेकरुन संक्रमित व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल कळू शकेल.

एयरोसोल काय आहे आणि हे ड्रॉपलेट्सपेक्षा वेगळे कसे?
एयरोसोल ड्रॉपलेट्स असतात आणि ड्रॉपलेट्स एयरोसोल. आकाराशिवाय यामध्ये कोणताच फरक नसतो. वैज्ञानिक पाच मायक्रोनपेक्षा कमी आकाराच्या ड्रॉपलेट्सला एयरोसोल म्हणतात. तुम्ही असे म्हणून शकता, की, रेड ब्लड सेलच्या एका सेलचे डायमीटर पाच मायक्रोन असते, तर व्यक्तीच्या एका केसाची रुंदी 50 मायक्रोन असते.

बातम्या आणखी आहेत...