आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Treatment Side Effects Update; Indian Council For Medical Research (Icmr) On Diabetes Patients

कोरोनामुळे डायबिटीजची शक्यता:ICMR ने सांगितले कोरोनाचे साइड इफेक्ट, म्हटले - कोरोना व्हायरस आजार डायबिटीजही देऊ शकतो, कारण यामुळे शुगर वाढते

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राजस्थानसह देशातील तीन राज्यांनी यापूर्वीच या आजाराला साथीच्या कॅटेगिरीमध्ये समाविष्ट केले आहे.

इंडियन कॉन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हटले आहे की कोरोनामुळे मधुमेह आजारही होऊ शकतो. गुरुवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव म्हणाले की कोरोनाव्हायरस मधुमेह देऊ शकतो, कारण यामुळे शुगर वाढते. याचा अर्थ असा आहे की कोरोना संक्रमणापूर्वी आपल्याला मधुमेह नसेल तर उपचार दरम्यान ही समस्या उद्भवू शकते. देशभरात काळ्या बुरशीच्या वाढत्या घटनामागील हेही एक कारण असू शकते.

केंद्र सरकारने गुरुवारी सर्व राज्यांना पत्र लिहून असे म्हटले आहे की काळ्या बुरशीला एक साथीचा रोग मानला पाहिजे. राजस्थानसह देशातील तीन राज्यांनी यापूर्वीच या आजाराला साथीच्या कॅटेगिरीमध्ये समाविष्ट केले आहे. काळ्या बुरशीच्या पीडितांसाठी राजधानी दिल्लीमध्ये स्वतंत्र केंद्रही सुरू करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांना शुगर किंवा मधुमेह होण्याचा धोका असतो
रेमडिसिवीर सारख्या स्टिरॉइड्सचा उपयोग कोरोना संसर्गावर उपचार करण्यासाठी केला जातो. हे स्टिरॉइड्स कोरोनाचे व्हायरल लोड कमी करण्यात मदत करतात. मात्र, हा कोरोना व्हायरसवरील उपचार नाही. गुरुवारी, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांच्या यादीतून रेमडिसिवीरला काढून टाकले. कारण त्याचे फायदे कमी आहेत आणि दुष्परिणाम जास्त आहेत. अशा औषधांचा जास्त वापर केल्यामुळे कोरोना रुग्णांना शुगर किंवा डायबिटीजचा त्रास होत आहे.

आधीच कोरोना विषाणूशी लढा देत असलेल्या रुग्णाच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अनेक पटीने वाढते. ज्यामुळे ब्लॅक किंवा व्हाइट फंगस होते.

ब्लॅक फंगसवर ICMR ने पॉइंटने प्रेजेंटेशन दिले
1. ब्लॅक फंगसला हलक्यात घेणे धोकादायक

 • ICMR नुसार, म्यूकरमाइकोसिस एक फंगल इन्फेक्शन आहे. जे लोक औषधांवर जिवंत आहे किंवा ज्यांना पहिलेच आरोग्याच्या समस्या आहेत, ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होत आहे अशा लोकांना हा रोग लक्ष्य करतो. अशा रुग्णांना श्वास घेतल्याने फंगल इन्फेक्शन होऊ शकते. नाक आणि फुफ्फुस याला बळी पडतात.
 • ब्लॅक फंगसचे रुपांतर भयंकर आजारात होऊ शकते आणि याचे लक्षण म्हणजे - नाक आणि डोळ्यांजवळ वेदना होतात आणि ते लाल होता, ताप, डोकेदुखी, कफ, श्वास घेण्यास समस्या, रक्ताची उल्टी आणि मनाचा गोंधळ अशा समस्या निर्माण होतात.

2. ब्लॅक फंगस होण्याची कारणे

 • मधुमेह अनियंत्रित होणे आणि त्याचा स्तर कमी-जास्त होणे.
 • स्टिरॉयड्सच्या वापरामुळे इम्युनिटी कमी होणे
 • ICU मध्ये राहणे
 • पहिलेच अनेक आजार असणे
 • वोरीकोनाजोल थेरेपी

3. कसे रोखले जाऊ शकते

 • एखाद्या धुळ असणाऱ्या कंस्ट्रक्शन साइटवर जाताना मास्क घाला.
 • मातीत काम करताना बुट आणि लांब मोजे घाला, लांब बाह्यांचा शर्ट आणि ग्लोव्स घाला.
 • स्वच्छता राखा आणि खूप स्वच्छ अंघोळ करा.

4. कधी सतर्क व्हावे

 • नाक बंद झाल्यावर, नाकातून रक्त किंवा काळे मॅटेरियल वाहत असल्यास, चीक बोनवर सलग वेदना होत असल्यास.
 • चेहऱ्यावर एका बाजूने वेदना झाल्यास, सुन्न झाल्यास किंवा सूज आल्यास.
 • नाकाच्या बाजूने काळे झाल्यास, दात दुखल्यास, दात पडल्यास किंवा जबडे ढिले पडल्यास.
 • वेदनांसोबतच अस्पष्ट दिसल्यास किंवा दोन चित्र दिसत असल्यास.
 • थ्रोम्बाउसिस, फीव्हर, स्किनचा रंग बदलणे किंवा रक्ताचा कफ आल्यास आणि श्वास घेण्याचा त्रास वाढल्यास.

5. यातून कसे बरे व्हावे

 • डायबिटीज कंट्रोल करा, स्टिरॉइड्स कमी करा, इम्युनिटी वाढवणाऱ्या औषधांचा वापर कमी करा.
 • सिस्टमॅटिक हायट्रेशन मेंटेन करा, PICC लाइन इंस्टॉलेशन, इम्फोटेरीसिन बीच्या वापरापूर्वी नॉर्मल आयव्ही दिली जावे.
 • 4-6 आठवड्यांपर्यंत अँटीफंगल थेरेपी दिली जावी.
 • फंगल इन्फेक्शनची सलग मॉनीटरिंग आणि इन्फेक्शनची रेडियो इमेजंग.
बातम्या आणखी आहेत...