आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्णांसाठी नवी आशा:औषधांमुळे बाहेर पडत नव्हता फुप्फुसातील कफ, चेस्ट फिजिओथेरपीने अनेक रुग्ण झाले नॉर्मल, ऑक्सिजन लेव्हलही झाली नॉर्मल​​​​​​​

जयपुर / दिनेश पालीवालएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोनामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रूग्णांमधील सर्वात मोठी चिंता ही आहे की रुग्णावर नेमके कसे उपचार करावेत? कोरोनाची लस आली आहे, परंतु कोरोना संक्रमणानंतर उपचाराविषयी जगभरात वेगवेगळी मते आहेत. वेगवेगळी औषधे आहेत.

दरम्यान, वेगवेगळ्या प्रदेशातील डॉक्टर त्यांच्या स्तरावर नवीन प्रयोग करीत आहेत, जे कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी देखील उपयुक्त सिद्ध होत आहेत. अशीच एक सुरुवात राजस्थानची राजधानी जयपूरमध्येही झाली आहे. आता येथे चेस्ट फिजिओथेरपी दिली जात आहे. या थेरपीमधून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत.

कोरोना संक्रमित असे रुग्ण जे ऑक्सिजनच्या अभावामुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी चेस्ट फिजिओथेरपी प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. जयपूरच्या बर्‍याच रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रूग्णांच्या सॅच्युरेशन (ऑक्सिजन पातळी )च नव्हे तर रूग्णाच्या फुफ्फुसांची रिकव्हरी वेगाने झाली आहे. यासोबतच जे रुग्ण ऑक्सिजनच्या आधारावर होते, त्यांची ऑक्सिजन पातळी या थेरपीमुळे सामान्य झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमितांची सॅच्युरेशन लेव्हल वाढवण्यासाठी डॉक्टरांनी ज्याप्रकारे प्रोनींग करण्याचा सल्ला दिला होता, ठीक त्याचप्रमाणे चेस्ट फिजिओथेरपीच्या माध्यमातूनही रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल वाढवून ती संतुलित ठेवली जाऊ शकते.

जयपुरच्या री-लाइफ हॉस्पिटलचे चीफ फिजिओथेरपिस्ट डॉ.अवतार डोई म्हणाले की, जयपूरमधील इतर हॉस्पिटलमध्ये चेस्ट फिजिओथेरपी अद्याप सुरू केलेली नाही, परंतु आम्ही वैयक्तिकरित्या काही रुग्णालयात जाऊन रुग्णांना ही थेरपी दिली. त्यांनी सांगितले की गेल्या 15-20 दिवसात 100 हून अधिक रुग्णांवर ही थेरपी केली असून त्याचे फार चांगले निकाल मिळाले आहेत.

या थेरपीमुळे केवळ रुग्णाच्या सॅच्युरेशन पातळीच वाढ झाली नाही, तर फुफ्फुसांची जलद रिकव्हरी झाली आहे. ही थेरपी घेतल्यानंतर रूग्णांना ऑक्सिजन सपोर्टची देखील आवश्यकता पडली नाही. डॉ. अवतार डोई म्हणाले की, ही थेरपी केवळ अशा रुग्णांना दिली जाते ज्यांची सॅच्युरेशन लेव्हल 80 किंवा त्यापेक्षा जास्त असेल. यात आपण रुग्णाच्या लँग्समध्ये जमा असलेला स्पुटम (कफ) मोकळा करतो, ज्यामुळे कफ बाहेर पडतो आणि रुग्णाच्या श्वासोच्छवासाची क्षमता वाढते.

अशाप्रकारे रुग्णाला आराम मिळतो

  • कोविड रूग्णाच्या फुफ्फुसाचे या विषाणूमुळे नुकसान होते तसेच पुष्कळ रुग्ण फुफ्फुसात टाइट स्पुटम (कफ) जमा झाल्याची तक्रार करतात. कफमुळे, फुफ्फुस त्यांच्या क्षमतेनुसार कार्य करत नाहीत, ज्यामुळे रुग्णाची रिकव्हरी देखील उशीर होते.
  • रिकव्हरीची गती वाढविण्यासाठी, रुग्णाच्या फुफ्फुसातून कफ काढून टाकणे आवश्यक असते, जेणेकरून ते चांगले कार्य करू शकेल आणि रुग्ण श्वास घेईल.
  • फुफ्फुसातील घट्ट कफ सैल करण्यासाठी, डॉक्टर वेगवेगळी औषधे देतात, ज्याला वेळ लागतो. याउलट चेस्ट थेरपीमध्ये औषधांशिवाय कफ सैल पडतो आणि आपोआप रुग्णाच्या शरीरातून बाहेर येऊ लागतो.
  • जेव्हा रुग्णाच्या शरीरातून कफ बाहेर पडते तेव्हा श्वास घेणे सोपे होते. संक्रमित फुफ्फुस देखील लवकर बरे होऊ लागतात.
बातम्या आणखी आहेत...