- Marathi News
- National
- Coronavirus Unlock Guidelines News Updated; Cinema Halls Can Re Open With Full Capacity And Swimming Pool
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनावर केंद्राची नवीन गाइडलाइन्स:आता सिनेमा हॉल ज्यास्त सिटिंग कॅपेसिटीसह उघडणार, स्वीमिंग पूलमध्ये सर्वांना जाण्यास परवानगी
नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
गृह मंत्रालयाने बुधवारी कोरोनावर नवीन गाइडलाइंस जारी केल्या. सरकारने सांगितले की, आता चित्रपट गृह आणि नाट्यगृह जास्त सिटिंग कॅपेसिटीसह उघडण्यास परवानगी असेल. यापुर्वी, 50% कॅपेसिटीसह उघडण्यास परवानगी होती. याशिवाय, स्वीमिंग पूलमध्ये सर्वांना जाण्यास परवानगी असेल. यापुर्वी, फक्त खेळाडूंना यात जाण्यास मंजुरी होती.
गाइडलाइनमधील महत्वाचे मुद्दे
- सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकार मास्क आणि सोशल डिस्टसिंगसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतील.
- डिस्ट्रिक्ट अथॉरिटी गरजेनुसार, कंटेनमेंट झोन तयार करू शकतील, पण यासाठी आरोग्य मंत्रालयांच्या निर्देशांचे पालन करावे लागेल.
- जिल्हा, पोलिस आणि नगरपालिकेचे अधिकारी कंटेनमेंट झोननमध्ये सर्व उपाय योजना लागू करण्यासाठी जबाबदार असतील.
- राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सरकार याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देतील.
- इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हलवर गृह मंत्रालयाच्या सल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन निर्णय घेईल.
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, प्रेग्नेंट महिला आणि 10 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सतर्कतेने राहावे लागेल.
- पॅसेंजर ट्रेन, शाळा, हॉटेल आणि रेस्टोरेंटसारख्या ठिकाणांसाठी यापूर्वीच SOPs जारी केली आहे. त्याचे पालन करावे लागेल.
- कंटेनमेंट झोनबाहेर सोशल, रिलीजस, स्पोर्ट्स, इंटरटेनमेंट, एजुकेशनल, कल्चरल गॅदरिंगसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेश SOP नुसार परवानगी देतील.
- सर्व प्रकारचे एक्जीविशन हॉल उघडू शकणार. यासाठी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स SOP जारी करेल.