आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccination : Health Minister's Statement On Side Effects Of Corona Vaccine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाचा 6 वा दिवस:देशभरात साइड इफेक्टची 600 प्रकरणे समोर आली, आरोग्यमंत्री म्हणाले - ही सामान्य बाब, प्रत्येक लसीकरणात असे होत असते

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो गुवाहाटीचा आहे. येथे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या डॉक्टरने कोरोना लस कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला - Divya Marathi
हा फोटो गुवाहाटीचा आहे. येथे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या डॉक्टरने कोरोना लस कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला

16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यापासून देशात जवळपास 600 साइट इफेक्टचे प्रकरणे समोर आली आहेत. काही राज्यांमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. मात्र लसीमुळे मृत्यू झाला नसल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्टच्या अहवालात आढळले आहे.

यावर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ''लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे हे सत्य आहे. जे काही साइड इफेक्ट्सची प्रकरणे समोर आली, ती सामान्य आहेत. कोणत्याही लसीकरणात असे होत असते.''

सर्वांना सुरक्षित ठेवणे आमची जबाबदारी: हर्षवर्धन

हर्षवर्धन म्हणाले की, "लसीकरण कोरोनाचा शेवटचा काळ ठरेल. काही लोक राजकीय फायदा घेण्यासाठी लसीकरणाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवित आहेत हे दुर्दैवी आहे. यामुळे, काही लोक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. लसीकरणानंतर कोणालाही नकारात्मक परिणाम मिळावा अशी सरकारची इच्छा नाही. सर्वांना सुरक्षित ठेवणे आमची जबाबदारी आहे.

20 जानेवारी रोजी 20 राज्यात लसीकरण

देशात आतापर्यंत 7.86 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणाच्या पाचव्या दिवशी (बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 लाख 12 हजार 7 लोकांना लस देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आदल्या दिवशी लसीकरणाची एकूण 2,353 सत्रे घेण्यात आली.

पहिल्याच दिवशी सर्वाधिक लोकांना लस दिली गेली

पहिला दिवस - 2,07,229

दुसरा दिवस - 17,072

तिसरा दिवस - 1,48,266

चौथा दिवस - 1,77,368

पाचवा दिवस - 1,12,007