आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccination In India | Coronavirus Vaccination, Corona Vaccine, Covishield, Covaxin, Coronavirus Outbreak In India, Health Ministry Of India, Jairam Ramesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीच्या किंमतीवरुण राजकारण:आरोग्य मंत्रालयाने म्हटले - केंद्र राज्यांना लस विनामूल्य देईल; थेट कंपनीकडून लस खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनी म्हणाली - उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणूकीची गरज

केंद्र सरकार राज्यांना दोन्ही कोरोना लस पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन देणार आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, केंद्र सरकारच्या दोन्ही कोरोना लसींचे दर प्रति डोस 150 रुपये असेल. केंद्राकडून या दराने लस खरेदी केली जाईल आणि पुर्वीप्रमाणेच ती राज्यांना पुरविली जाईल. राज्य सरकारांनी थेट कंपनीकडून लस विकत घेतल्यास या लसीसाठी त्यांना पैसे मोजावे लागतील.

जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केले
तत्पूर्वी काँग्रेस नेते जयराम यांनी लसीच्या दरावर प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावर एक अहवाल शेअर करताना ते म्हणाले की, खासगी रूग्णालयाला सीरमकडून प्रति डोस 600 रुपये दराने कोविशिल्ड लस दिली जाईल. हा जगातील सर्वोच्च दर आहे.

राज्य सरकारांना ही लस 400 रुपये दराने मिळणार असल्याचे त्यांनी लिहिले. हे अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, सौदी, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका सरकारने खर्च केलेल्या दरापेक्षा अधिक आहे. मेड इन इंडिया लस स्वत:च्या देशात इतकी महाग का दिली जाते? म्हणून, किंमती पुन्हा निश्चित केल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.

कंपनी म्हणाली - उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणूकीची गरज
कोविशिल्डची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने किंमतींबाबतच्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की लसचा केवळ एक भाग खासगी रुग्णालयात प्रति डोस 600 रुपये विकला जाईल. इतर वैद्यकीय उपचारांच्या तुलनेत ही किंमत खूपच कमी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आगाऊ निधी मिळाल्यामुळे लस किंमती सुरुवातीच्या काळात कमी होत्या. आता आम्हाला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. अधिक उत्पादनासाठी क्षमता वाढवावी लागेल.

भारत आणि जगातील लसींच्या किंमतींमध्ये चुकीची तुलना करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. आज बाजारात कोविशिल्ड ही सर्वात स्वस्त कोरोना लस उपलब्ध आहे. सध्या गोष्टी फार कठीण आहेत. व्हायरस सतत म्युट होतोय, त्यामुळे लोकांच्या जीव धोक्यात आहे. अशा परिस्थितीत, साथीच्या आजाराशी लढण्याची आपली क्षमता वाढवून आपण लोकांचे प्राण वाचवावे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणाले- बीपीपीआयने लसीची किंमत ठरवावी
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कोविशिल्ड या कोरोनाच्या लसीची किमान किंमत ब्यूरो ऑफ फार्मा PSU ऑफ इंडिया (BPPI) ने निश्चित करावी अशी मागणी केली आहे. सर्व राज्यांनी बीपीपीआयला पैसे देऊन त्यांच्या गरजेनुसार लस घ्यावी. असे केल्याने देशभरात एकाच किंमतीला लस मिळू शकेल. या लसीची किमान किंमत 1 मेपूर्वी निश्चित करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

1 मे पासून 18+ वयोगटातील लोकांना लसीकरण
तत्पूर्वी, 1 मेपासून सरकारने 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लस बनवणार्‍या कंपन्या त्यांचा 50% पुरवठा केंद्राला करतील, असा निर्णय केंद्राने घेतला होता. उर्वरित 50% राज्य सरकारांना ते पुरवू शकतील किंवा खुल्या बाजारात देखील ते विकू शकतील.

पूर्वीप्रमाणेच लसीकरणासाठी कोविनमार्फत नोंदणी करणे आवश्यक असेल. लसींची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकारांना थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्याचे अधिकार दिले होते.

आता सुरु असलेले विनामुल्य कोरोना लसीकरण सुरू राहणार
सरकारकडून लसीकरण मोहीम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. त्याअंतर्गत प्राधान्य गटांना विनामूल्य लसीकरण केले जात आहे. यात हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा समावेश आहे.

प्रथम डोस घेतलेल्यांना लसीकरण करण्यास प्राधान्य
लसीचा पहिला डोस घेतलेल्या हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन कामगारांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यांना देखील दुसरा डोस घेण्यास प्राधान्य मिळेल. हे सर्व काम निश्चित रणनीतीद्वारे केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...