आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccination India Update; Health Ministry Joint Secretary Lav Agarwal Press Meet Today; News And Live Updates

कोरोनाची 75 दिवसांपूर्वी सारखी परिस्थिती:कोरोनाचे नवीन प्रकरणे 85% ने झाले कमी; पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सतत घट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी मुंबईतील विलेपार्लेतील लसीकरण शिबिरात अनेक लोक पोहोचले. दरम्यान लाेकांनी सामाजिक अंतर पाळले नाही.

देशातील कोरोना महामारीचा वाढता प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत आढळणार्‍या नवीन प्रकरणात 85 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यासोबतच कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटही सातत्याने कमी होत आहे. गेल्या 75 दिवसांनंतर ही परिस्थिती तयार झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये 1 ते 10 वर्षे वयोगटातील 3.28% मुलांना संसर्ग झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दुसर्‍या लाटेत ही आकडेवारी 3.05% इतकी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 11 ते 20 वर्षे वयोगटातील 8.03% मुल कोरोनाबाधीत झाले होते तर दुसर्‍या लाटेमध्ये याचे प्रमाण 8.5% होते.

आतापर्यंत 26 कोटी लोकांचे लसीकरण
देशात आतापर्यंत 26 कोटी लोकांचे लसीकरण झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. जर कोरोनापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क आण‍ि सामाजिक अंतर राखले पाहिजे. शक्य होत असेल तर प्रवास करु नका असेही ते म्हणाले.

भारतात तयार होणार नोवाव्हॅक्स लस
नीत‍ी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, नोवाव्हॅक्सच्या चाचणीचे निकाल आशादायी आहेत. ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आम्ही सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या डेटावरून शिकत आहोत. या लसीची निर्मिती भारतात केली जाणार आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या आता केल्या जात असून प्रगत अवस्थेत असल्याचे पॉल म्हणाले.

डेल्टा+ व्हेरिएंटवर अधिक अभ्यासाची गरज
डॉ व्ही.के. पॉल म्हणाले की, कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमध्ये डेल्टा व्हेरियंटची महत्वपूर्ण भूमिका होती. हे व्हेरियंट मार्च महिन्यात युरोपमध्ये आढळले होते. या व्हेरियंटच्या अतिरिक्त उत्परिवर्तन डेल्टा+ चा शोध लावण्यात आला असून ते ग्लोबल डेटा सिस्टमला सादर केले गेले आहे.

निष्काळजीपणामुळे आणखी बिघडू शकते परिस्थिती
कोरोना महामारीचे नवीन व्हेरियंट 2020 च्या तुलनेत अधिक घातक असल्याचे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. आता आम्हाला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असून जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळले पाहिजे. मास्कचा सतत वापर करावा नाहीतर ही परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...