आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccination LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा नवीन स्ट्रेन:18 राज्यांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन स्ट्रेन, 194 जणांना लागण झाल्याची माहिती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या धक्कादायक माहितीनंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे

देशातील 18 राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन पसरला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन यूके, साउथ आफ्रीका आणि ब्राझीलवरुन आला आहे. या नवीन स्ट्रेनची आतापर्यंत 194 लागण झाली आहे. केंद्र सरकारने देशातील वाढत्या प्रकरणांमुळे या 18 राज्यांवर विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने या राज्यातील नवीन स्ट्रेनच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या 194 लोकांपैकी 187 जणांमध्ये यूकेचा व्हॅरिएंट मिळाला आहे. 6 साउथ आफ्रीकन आणि एक ब्राझीलियन स्ट्रेन आहे. आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांव विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यात महाराष्ट्र, केरळ, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, असाम, पश्चिम बंगाल,तमिळनाडू, पंजाबसारख्या राज्यांचा समावेश आहे.

दोन दिवस लसीकरण बंद

देशभरात पुढील दोन दिवस म्हणजेच 27 आणि 28 फेब्रुवारीला लसीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारीदिली. त्यांनी सांगितले की, या दोन दिवसात Co-Win मोबाइल अॅपला सामान्य लोकांसाठी अपडेट केले जाईल. या अॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिक लसीकरणासाठी आपले नाव देऊ शकतात. आतापर्यंत या अॅपद्वारे फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सचे रजिस्ट्रेशन सुरू होते. या अॅपवर व्हॅक्सीन घेणाऱ्या प्रत्येकाचा डेटा उपलब्ध असतो, यावरुनच संबंधित व्यक्तीला सर्टिफीकेट दिले जाते.

1 मार्चपासून सामान्य लोकांना लस दिली जाणार

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. 10 हजार सरकारी केंद्र आणि 20 हजार खासगी हॉस्पीटलमध्ये लसीकरण होईल. यात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आजारी व्यक्ती आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना लस दिली जाणार. सरकारी केंद्रांवर लसीकरण मोफत असेल, तर खासगी केंद्रांवर पैसे मोजावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...