आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccination Tracker Phase 2 Latest News Update; Over 1.66 Crore Covid Vaccine Doses Administered So Far

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना लसीकरण:​​​​​​​डोज देण्याचा वेग रोज वाढतोय, पहिल्यांदाच एका दिवसात देण्यात आले लसीकरणाचे जवळपास 10 लाख डोज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती.

लसीकरणामध्ये खासगी क्षेत्रांना सामिल केल्यानंतर रोजच्या डोजची संख्या झपाट्याने वाढत आहे. लसीकरणाच्या फेज-2 नुसार गेल्या तीन दिवसांमध्ये रोज जवळपास 2 लाख लसीच्या डोजची वाढ झाली आहे. 1 मार्चला 5.52 लाख डोज देण्यात आले होते. 2 मार्चला 7.68 लाख आणि 3 मार्चला 9.94 लाख डोज देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या डेटानुसार, भारतात बुधवारपर्यंत 1.66 कोटी डोज देण्यात आले आहेत. यामध्ये 1.37 कोटी लोकांना कमीत कमी पहिला डोज देण्यात आला आहे. तर 28.76 लाख लोकांनी दुसरा डोजही दिला आहे.

देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलाही लस देण्यात आली होती. 13 फेब्रुवारीपासून हेल्थकेअर वर्कर्सला दुसरा डोज देण्यात येत आहे. फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्याची सुरुवात 2 मार्चला झाली आणि बुधवारी जवळपास 3,500 फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्यात आला.

लसीकरण अपडेट...

  • लसीकरण्याच्या 47 व्या दिवशी एकूण 9.94 लाख डोज देण्यात आले. यामध्य 8.31 लाख पहिले डोज होते, तर 1.63 लाख दुसरे डोज होते.
  • हे सर्व मिळून आतापर्यंत 67.8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोज देण्यात आला आहे. तर 28.3 लाख जणांनी दुसरा डोजही घेतला आहे.
  • फ्रंटलाइन वर्कर्सविषयी बोलायचे झाले तर 57.63 लाख जणांनी पहिला डोज घेतला आहे, तर जवळपास साडे तीन हजार जणांनी दोन्ही डोज घेतले आहेत.
  • व्हॅक्सीनेशनच्या फेज-2 मध्ये 8.50 लाख सीनियर सिटीजन्सने लसीचा पहिला डोज घेतला आहे.
  • 45-59 वर्षांचे गंभीर आजारांशी लढत असलेल्या 1.05 लाख लोकांनीही पहिला डोज घेतला आहे.

इजरायलमध्ये 96% लोकसंख्येचे लसीकरण
संपूर्ण जगात लोकसंख्येच्या हिशोबाने इजरायलने लसीकरणामध्ये मोठे यश मिळवले आहे. Ourworldindata च्या आकड्यांनुसार इजरायलने 96% लोकसंख्येला लस दिली आहे. यानंतर यूएई (61.62%), यूके (31.5%), यूएसए (23.51%), सर्बिया (22%) मध्ये लसीकरण झाले आहे. चीन (3.6%) आणि भारत (1.15%) या प्रकरणात जगाच्या तुलनेत सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे मागे आहेत.

बातम्या आणखी आहेत...