आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus VaccinationLatest Update 5 Feb; Covishield, Covaxin | Over 45 Lakh Lakh Healthcare Workers To Get Covid 19 Vaccine Dose

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आतापर्यंत 45 लाख लोकांचे लसीकरण:इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात वेगाने होत आहे लसीकरण; 73.6% सह मध्यप्रदेश टॉपवर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॅक्सीनचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून लागेल

देशात आतापर्यंत 44 लाख 49 हजार 552 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात वेगाने व्हॅक्सीनेशन होत आहे. भारतात फक्त 18 दिवसात 40 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. तिकडे, अमेरिकेत 20 दिन आणि इस्राइल-ब्रिटनमध्ये इतक्याच लोकांना लस देण्यासाठी 39 दिवस लागले होते.

मध्यप्रदेशात सर्वाधिक 73.6% आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली

मध्यप्रदेशात आतापर्यंत सर्वाधिक 73.6% आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आता फक्त 26.4% आरोग्य कर्मचारी उरले आहे, ज्यांना लस देण्याचे बाकी आहे. याशिवाय देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातही 50% आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

पुडुचेरीमध्ये सर्वात कमी 12.60% आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्हॅक्सीन घेतली. ओव्हरऑल व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत उत्तर प्रदेश सर्वात पुढे आहे. येथे सर्वात जास्त 4.63 लाख म्हणजेच 10.4% व्हॅक्सीनेशन झाले आहे. यानंतर महाराष्ट्र (8.2%), मध्य प्रदेश (8%), कर्नाटक (7.4%) आणि गुजरात (7.1%) नंबरवर आहे.

सर्वाधिक लसीकरण अमेरिकेत

जगात व्हॅक्सीनेशनच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. तिथे आतापर्यंत 33.88 मिलियन (3.3 कोटी) लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. यानंतर ब्रिटेन 10.52 मिलियन (1.05 कोटी), इस्राइल 5.21 मिलियन (52.1 लाख) , जर्मनी 2.71 मिलियन (27.1 लाख) लोकांना लस देण्यात आली आहे.

गुरुवारी 3.10 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली

मंत्रालयाने सांगितले की, मागील 24 तासात 8,041 सेशंसमध्ये 3 लाख 10 हजार 604 लोकांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 84,617 सेशंस आयोजित केले आहेत. मंत्रालयाने हेदेखील सांगितले की, कोरोना व्हॅक्सीन लावणारे 55% लोक 7 राज्यातील आहेत.

8 हजार लोकांमध्ये दिसले साइड इफेक्ट

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत 88.95% लोकांनी एडवर्स इफेक्टची माहिती दिली. हे आकडे 5.12 लाख लोकांच्या फीडबॅकच्या आधारावर काढले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हमाले की, आतापर्यंत 44 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे, यातील 8,563 लोकांमध्ये साइड इफेक्ट दिसले आहेत.

व्हॅक्सीनचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून लागेल

कोरोना लसीकरण अभियानांतर्गत आरोग्य कर्मचार्यांना 13 फेब्रुवारीपासून व्हॅक्सीनचा दुसरा डोस दिला जाईल. निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितले की, हा डोस व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या लोकांनाच दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...