आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccine Campaigns First Day Udpate | How Many People Vaccinated In India On First Day

भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम:पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात शनिवारपासून जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. मात्र लक्ष्याच्या तुलनेत, पहिल्याच दिवशी केवळ 53% लोकांना कोरोना लस देण्यात आली. 3,006 ठिकाणी 3 लाख 15 हजार 37 लोकांना लस दिली जाईल असे सरकारने सांगितले होते. संध्याकाळी सरकारने पत्रकार परिषदेत सांगितले की केंद्रांची संख्या वाढून 3351 झाली आहे, परंतु येथे केवळ 1 लाख 65 हजार 714 लोकांना लस देण्यात आली. संध्याकाळी 7.45 वाजेपर्यंत हा डेटा एक लाख 91 हजार 181 पर्यंत पोहोचला.

पहिल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरकारने नोंदविलेली आकडेवारी लक्ष्यातील केवळ 53% आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी 3351 ठिकाणी 3 लाख 35 हजार 100 लोकांना लस दिली जाऊ शकली असती. पहिल्या दिवशी काही ठिकाणी लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्यास उशीर झाल्याचेही सरकारने सांगितले आहे. तथापि, सरकार पहिल्या दिवसासाठी अंतिम आकडेवारी नंतर जाहीर करणार आहे.

सर्वाधिक लसीकरण करणारी 15 राज्ये

आंध्र प्रदेश16,963
बिहार16,401
उत्तर प्रदेश15,975
महाराष्ट्र15,727
कर्नाटक12,637
प. बंगाल9,578
राजस्थान9,279
ओडिसा8,675
गुजरात8,557
केरळ7,206
मध्यप्रदेश6,739
छत्तीसगड4,985
हरियाणा4,656
तेलंगाणा3,600
तमिळनाडू2,728
बातम्या आणखी आहेत...