आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकड्यांमध्ये व्हॅक्सिन:सरकारी आकड्यांमध्ये 8.5 कोटी डोस महिन्यात तयार होत आहेत, परंतु मे च्या 3 आठवड्यात केवळ 3.6 कोटी डोस देण्यात आले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात व्हॅक्सिनचे गणित गुंतागुंतीचे होत चालले आहे. सरकारी आकडेवारीत व्हॅक्सिनची संख्या पुरेशी असल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्यांचे वाटप फारच कमी आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, दरमहा सुमारे 8.5 कोटी लस डोस तयार होत आहेत, परंतु मेच्या पहिल्या तीन आठवड्यांत केवळ 3.6 कोटी लस देण्यात आल्या आहेत.

सध्या देशातील लस उत्पादनाची आकडेवारी किती आहे?

  • सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दरमहा कोविशिल्डच्या साडेसहा कोटी डोसची निर्मिती करीत आहे. सीरमने देखील याची पुष्टी केली.
  • भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे 2 कोटी डोस एवढ्याच वेळेत बनवत आहे. कंपनीचे सीएमडी कृष्णा एल्ला यांच्या निवेदनातूनही ही आकडेवारी योग्य असल्याचे दिसून आले आहे.
  • कोव्हॅक्सिनचे उत्पादन जुलैच्या अखेरीस 2 कोटींवरून 5.5 कोटींवर जाईल. कृष्णा एल्ला म्हणाले होते की, मे महिन्यातच हे उत्पादन 3 कोटी प्रतिमहिना होईल.
  • स्पुतनिक सध्या दरमहा 30 लाख डोस तयार करीत आहे आणि जुलैच्या अखेरीस त्याचे उत्पादन 1.2 कोटीपर्यंत पोहोचेल.

उत्पादनानुसार मे महिन्यात किती लस देण्यात आल्या?

  • सरकारने सांगितलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात केवळ कोविशील्ड-कोव्हॅक्सिनचे जवळपास 8.5 कोटी डोस तयार केले गेले आहेत. म्हणजेच, 31 दिवसांसाठी दररोज 27.4 लाख डोस.
  • आता कोविन पोर्टलवर व्हॅक्सिनची आकडेवारी पाहिल्यास, 22 मे पर्यंत देशात 3.6 कोटी पेक्षा कमी डोस दिले गेले आहेत. म्हणजेच दररोज 16.2 लाख डोस. लसीकरण याच वेगाने चालल्यास महिन्याच्या अखेरीस देशात 5 कोटी डोस दिले जातील.
  • आता गेल्या 7 दिवसांची आकडेवारी पाहिल्यास यात मोठी घसरण झाली आहे. 16.2 लाख डोसपेक्षा दररोज 13 लाखांपेक्षा कमी डोस देण्यात येत आहेत.
  • मे महिन्यात 5 कोटी डोस दिले गेले तरी, असा प्रश्न उपस्थिती होतो की, जर 8.5 कोटी डोस तयार होत आहेत तरीही वास्तवात लसीकरणाचे आकडे कमी का आहेत? तेही अशावेळेस जेव्हा राज्ये सतत लस नसल्याची तक्रार करत आहेत?
बातम्या आणखी आहेत...