आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सीरम इंस्टीट्यूटच्या कोवीशील्डच्या एक दिवसानंतर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची डिलीव्हरीही सुरू झाली आहे. कोव्हॅक्सीनची पहिली खेप बुधवारी सकाळी 6.40 वाजता एअर इंडियाच्या फ्लाइटने हैदराबादहून दिल्लीत पाठवण्यात आली. दिल्ली व्यतिरिक्त बंगळुरू, चेन्नई, पटना, जयपूर आणि लखनौसाठीही कोव्हॅक्सीन पाठवण्यात आली.
जयपूर : एअर एशियाच्या फ्लाइटने कोव्हॅक्सिनचे 60 हजार डोज सकाळी 11 वाजता जयपूरला पोहोचली. त्यांना एअरपोर्टवरुन थेट आदर्श नगगर येथील स्टेट ड्रग स्टोरमध्ये नेण्यात आले. कोवीशील्डचे डोजही आज संध्याकाळी जवळपास पाच वाजता जयपूर एअरपोर्टवर पोहोचण्याची आशा आहे.
भोपाळ : कोवीशील्डचे 5 लाख डोज पोहोचले
सीरम इंस्टीट्यूटने मंगळवारी वेगवेगळ्या शहरांमध्ये व्हॅक्सीन पाठवणे सुरू केले होते. अनेक शहरांमध्ये आज व्हॅक्सीन पोहोचली आहे. भोपाळमध्ये सकाळी 11 वाजता कोवीशिल्डचे 5 लाख डोज पोहोचले. येथून मध्य प्रदेशच्या 24 जिल्ह्यांमध्ये व्हॅक्सीन पाठवण्यात येईल.
सरकारने कोव्हॅक्सीनची 55 लाख डोजची ऑर्डर दिली
16 जानेवारीपासून देशात कोरोना व्हॅक्सीनेशन सुरू होईल. ड्रग रेग्युलेटरने कोव्हॅक्सिन आणि कोवीशिल्डच्या एमरजेंसी वापराला मंजूरी दिली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, सरकारने कोव्हॅक्सिनचे 55 लाख आणि कोवीशील्डचे 1.1 कोटी डोजची ऑर्डर दिली आहे.
भारत बायोटेक सरकारला 16.5 लाख डोज फ्री देणार
भारत बायोटेक इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून कोरोना व्हॅक्सीन बनवत आहे. कंपनी 16.5 लाख डोज सरकारला फ्री देणार आहे. इतर 38.5 लाख व्हॅक्सीनच्या प्रत्येक डोजसाठी 295 रुपये चार्ज असणार आहे.
दुसरीकडे, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे CEO अदार पूनावाला यांनी मंगळवारी म्हटले की, कोवीशील्डचे 10 कोटी डोज सरकारला 200 रुपयांच्या स्पेशल रेटवर दिले जातील. तर बाजारात व्हॅक्सीनची किंमत 1000 रुपये असेल.
कोवीशील्डच्या दोन्ही डोजची एफिकेसी 70% राहिली
कोवीशील्डला एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने मिळून बनवले आहे. भारतात SII सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कोवीशील्डचे प्रोडक्शन करत आहे. याचा जेव्हा हाफ डोज देण्यात आला तेव्हा इफिकेसी 90% राहिली. एका महिन्यानंतर फूल डोजमध्ये एफिकेसी 62% राहिली. दोन्ही प्रकारच्या डोसमध्ये सरासरी कार्यक्षमता 70% होती. कोविशील्डचे 5 कोटी डोस तयार आहेत.
कोव्हॅक्सीनच्या फेज -3 चाचणीचा निकाल अद्याप मिळालेला नाही. फेज -2 चाचणीच्या निकालांनुसार, कोव्हॅक्सीनमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी 6 ते 12 महिने टिकतील. कोवाक्सिनचे 20 दशलक्ष डोस तयार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.