आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Vaccine Drone Delivery Project; ICMR Seeks Bid, Telangana Government Launched Project

कोरोनावर ड्रोन अटॅक:ग्रामीण आणि दुरस्थ भागांमध्ये ड्रोनने होणार लसींचा पुरवठा, ICMR ची योजना; तेलंगणा सरकारने आधीच केला प्रयोग

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • फ्लिपकार्ट आणि डुंजोने तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पात मदत करण्याची घोषणा केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकार आता ड्रोनद्वारे लसींच्या पुरवठ्याविषयी विचार करत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या प्रकल्पांसाठी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. ज्या भागांमध्ये लसींचा पुरवठा करणे कठिण जात आहे अशा भागात लस वितरण करण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे. दरम्यान, ही यंत्रणा कार्य करेल की नाही हे शोधण्यासाठी तेलंगणा सरकारने वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी ड्रोन वितरण प्रकल्प सुरू केला आहे.

फ्लिपकार्ट आणि डुंजोने तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पात मदत करण्याची घोषणा केली आहे. ते वितरण प्रणाली विकसित करतील आणि लस वितरण योजना पुढे आणतील.

11 जूनला ICMR द्वारे जारी केलेल्या निविदेत म्हटले आहे की, लसी प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्यासाठी अशी सिस्टम डेव्हलप करण्यावर विचार केला जात आहे, ज्यामध्ये ड्रोनद्वारे वितरण केले जाऊ शकेल. ही निवड अशा निवडक भागात होईल जेथे लस देणे शक्य नाही. हे टेंडर एचएलएल इन्फ्राटेक सर्व्हिसेस लिमिटेडच्या माध्यमातून पुढे आले आहे. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार ही निविदा काढण्यात आली असून, त्यामध्ये मानवरहित हवाई वाहनाद्वारे लसी पुरवठ्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. एप्रिलमध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाने आयआयटी कानपूरसह आयसीएमआरला हा अभ्यास करण्यास मान्यता दिली होती.

ICMR ची रिक्वायरमेंट

 • ICMR ला असे ड्रोन हवे आहे, जे 100 मीटरच्या उंतीवर 35 किलोमीटरपर्यंत उड्डाण घेऊ शकेल.
 • हे ड्रोन कमीत कमी 4 किलोचे वजन उचलण्यास सक्षम असावे.
 • संशोधनात पॅराशूट बेस्ड डिलिव्हरी उपयुक्त मानली गेलेली नाही.

आता समस्या का
केंद्राने 20 कंपन्यांची निवड केली होती. ज्यांना आयसीएमआरच्या अटीनुसार ड्रोन डिलिव्हरी वापरायची होती. आयसीएमआरने एक अट ठेवली होती की डिलिव्हरी अशा भागांमध्ये केली जावी, जे दिसत नाहीत म्हणजेच beyond visual line of sight. परंतु आतापर्यंत कोणत्याही कंपनीने असे ऑपरेशन केलेले नाही. कारण, सध्याच्या नियमांनुसार ते त्याच भागांमध्ये आपले ड्रोन ऑपरेट करु शकतात, जे व्हिज्यूअल रेंजमध्ये असतात.

सध्या देशातील लसीकरण स्थिती

 • सध्या देशात मोठ्या प्रमाणा दोन व्हॅक्सीनचा वापर होत आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन देशात तयार झाली आहे. याला भारत बायोटेकने बनवले आहे. तर ब्रिटेनची ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका व्हॅक्सीन कोवीशील्ड भारतात सीरम इंस्टीट्यूट बनवत आहे.
 • रशियन व्हॅक्सीन स्पुतनिक-V ला भारतात डॉक्टर रेड्डीज लॅब बनवत आहे. खरेतर ही व्हॅक्सीन सध्या काही प्रायव्हेट रुग्णालयांमध्येच मिळत आहे. ही लस लवकरच प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.
 • DCGI च्या निर्णयाने फायजर आणि मॉडर्नासारख्या लसी देशात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर देशाच्या व्हॅक्सीनेशन प्रोग्रामविषयी बोलायचे झाले तर आतापर्यंत 25 कोटींपेक्षा जास्त व्हॅक्सीनचे डोस देण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...