आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हॅक्सीनला एमरजन्सी अप्रूव्हलची तयारी सुरू असतानाच राज्य आणि केंद्र स्तरावर शनिवारी लसीकरणाची रंगीत तालीम सुरू आहे. याच दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना केवळ दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले आहे.
#WATCH | Not just in Delhi, it will be free across the country: Union Health Minister Dr Harsh Vardhan on being asked if COVID-19 vaccine will be provided free of cost pic.twitter.com/xuN7gmiF8S
— ANI (@ANI) January 2, 2021
आरोग्य मंत्र्यांनी दिल्लीतील एका रुग्णालयात जाऊन ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच कोरोना व्हॅक्सीन संदर्भातील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. पोलिओ व्हॅक्सीनच्या वेळी सुद्धा देशात आणि विदेशात विविध प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. तरीही सर्वत्र त्या व्हॅक्सीन देण्यात आल्या आणि देशातून पोलिओचा नायनाट झाला अशी आठवण यावेळी आरोग्य मंत्र्यांनी करून दिली.
कोण-कोणत्या राज्यातील किती जिल्ह्यात ड्राय रन?
ड्राय रनच्या प्रक्रियेत महाराष्ट्रासह काही निवड शहरांची निवड करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील 6 आरोग्य केंद्र, महाराष्ट्रातील 4 जिल्हे, बिहारचे 3 जिल्हे, कर्नाटकातील 5 जिल्ह्यांमध्ये, हरियाणातील पंचकुला येथे, मध्य प्रदेशातील राजधानीत आणि गुजरातच्या 4 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन घेण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.