आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccine India Launch Date Update : Indigenous Vaccine May Be Launched Till August 15

कोरोना काळात दिलासादायक बातमी:15 ऑगस्टपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते स्वदेशी लस, आयसीएमआरचे भारतीय बायोटेकला निर्देश - चाचणी त्वरित घ्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्र यासह दहा राज्यांमधील 12 संस्थांमध्ये लसीची चाचणी घेण्यात येणार आहे.
  • पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे, मनुष्यांवरील चाचणीसाठी नुकतीच मंजूरी मिळाली आहे.

भारतात तयार केलेली कोरोना लस 15 ऑगस्ट रोजी लाँच केली जाऊ शकते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) क्लिनिकल ट्रायल करणाऱ्या संस्थांना 7 जुलैपासून क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यास सांगितले आहे. कोणत्याही क्षणाचाही उशीर न करता या चाचण्या घेण्यात याव्या असे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून 15 ऑगस्टपर्यंत ही लस लॉन्च केली जाऊ शकेल. मात्र अंतिम परिणाम हे सर्व क्लिनिकल चाचण्यांच्या यशावर अवलंबून असेल.

यासंदर्भात, आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेक आणि याचे क्लीनिकल ट्रायल करणाऱ्या 12 संस्थांना पत्र लिहिले आहे. 

आयसीएमआरच्या लीक झालेल्या पत्रात असेही म्हटले होते की 15 ऑगस्टपर्यंत लस तयार होईल

यापूर्वी आयसीएमआरच्या महासंचालकांचे भारत बायोटेकला लिहिलेले एक पत्र लीक झाले होते. यामध्येही 15 ऑगस्टपर्यंत ही लस तयार होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पत्रामध्ये असे म्हटले होते की, आदेशाचे पालन न करणे अत्यंत गंभीर मानले जाईल, म्हणूनच या प्रकल्पाला सर्वात जास्त प्राधान्य द्या आणि निर्धारित मुदतीत ते पूर्ण करावे, असा सल्ला आपल्याला देण्यात आला होता.

नुकतीच मनुष्यावर क्लीनिकल ट्रायलची मिळाली मंजूरी

कोरोनाची देशातील पहिली लस हैदराबाद येथील फार्म कंपनी भारत बायोटेकने तयार केली आहे. हे आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केले गेले आहे. प्राण्यांवरील त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. मनुष्यावरील चाचणीसाठी नुकतीच मंजूरी मिळाली आहे. या चाचण्या या महिन्यापासून सुरू होत आहेत. भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार, हैदराबादच्या गनोम व्हॅलीमध्ये बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कंटेनमेंट सुविधामध्ये ही लस तयार केली गेली आहे.

घाईत लस तयार करणे चांगले नाही

तज्ञांनी चेतावणी दिली की घाईघाईत लस तयार केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. 1955 मध्ये ओरिजिनल साल्क पोलियोची वॅक्सीन बनवण्यात घाई केली केली. मात्र याचा काही फायदा झाला नाही.  लस तयार करताना राहिलेल्या त्रुटीमुळे 70,000 मुलांना पोलिओ झाला होता. तर अनेक मुलांचा मृत्यू झाला होता. 

0