आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना लसीबाबत लवकरच खुशखबर येऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही व्हॅक्सीन कँडिडेट्सला पुढील काही दिवसात लायसेंस दिले जातील. सीरम, भारत बायोटेक आणि अमेरिकी कंपनी फाइजरने इमरजंसी अप्रूव्हलसाठी अप्लाय केले आहे. सरकारने सांगितले की, या तिन्ही कंपन्यांना किंवा यातील एका कंपनीला लवकरच व्हॅक्सीनेशनची परवानगी मिळू शकते.
सरकारने म्हटले की, सुरुवातीला एक कोटी फ्रंट लाइन वर्कर्सला व्हॅक्सीन दिली जाईल. सध्याच्या कोल्ड चेनमध्ये 3 कोटी व्हॅक्सीनची स्टोरेज क्षमता आहे. याशिवाय को-विन सॉफ्टवेअरवर फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्सचा डेटादेखील अपलोड केला जात आहे. सरकारने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच व्हॅक्सीन मॅन्यूफॅक्चरर्स आणि शास्त्रज्ञांशी चर्चा केली. सध्या देशात आता 6 कोरोना व्हॅक्सीन क्लीनिकल ट्रायल स्टेजमध्ये आहेत.
एकूण रुग्णातील 54% फक्त पाच राज्यात
आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, देशात एकूण रुग्णांपैकी 54% रुग्ण फक्त महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये आहेत. शास्त्रज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनचे प्रोडक्शन सुरू करणार आहोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.