आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Welcome 2021
 • Coronavirus Vaccine, PPE Kits Record To India World's 5th Largest Economy; India Greatest Achievements In 2020 | Year Ender Achievements Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये देशाच्या टॉप 10 अचीव्हमेंट:​​​​​​​व्हॅक्सीन बनवण्यात नंबर 1 आणि पीपीई किट बनवण्यात नंबर 2 बनलो, जास्त प्रोटीन असणाऱ्या गव्हाने कुपोषण संपवणार

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अभिमान बाळगा, कारण स्वदेशी व्हॅक्सीनचे परिणाम प्रभावी, जानेवारीपर्यंत मिळू शकते व्हॅक्सीन
 • आनंदी व्हा, कारण हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपालने देशाचे नाव रोशन केले.
 • दिलास्याची जाणीव करुन घ्या, कारण 30 वर्षात बाल मृत्यू दर 1.25 कोटींनी कमी होऊन 52 लाख झाला

2020 मध्ये केवळ कोरोनाने देशात विक्रम केला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्हॅक्सीन आणि पीपीई किटनेही इतिहास रचला. महामारीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये चीननंतर सर्वात जास्त पीपीई किट बनवून भारताने जगाला चकीत केले. यासोबतच स्वाइन फ्लू, निमोनिया आणि कोरोनाची स्वदेशी व्हॅक्सीन बनवून जगाला दाखवून दिले की, भारत महामारीतही इतिहास लिहिण्यास तयार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात दिर्घकाळपर्यंत पीएम राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान बनले.

एवढेच नाही, हॉकीची टीमची कॅप्टन राणी रामपाल पहिली अशी भारतीय बनली, जिला वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द ईयरचा अवॉर्ड देण्यात आला. तिकडे देशात मुलांच्या मृत्यूचे ओझेही कमी झाले आणि सीनियर अॅडव्होकेट हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार नियुक्त करण्यात आले.

जाणून घ्या , 2020 च्या त्या उपलब्धता ज्या भारताच्या नावे राहिल्या आणि जगभरात ज्यांची चर्चाही झाली

1. ब्रिटन आणि फ्रान्सला मागे सोड भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली

 • फेब्रुवारी 2020 मध्ये आलेल्या 'वर्ल्ड पॉपुलेशन रिव्ह्यू' च्या रिपोर्टनुसार, ब्रिटन आणि फ्रान्सला मागे सोड भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. भारताचा जीडीपी 2.94 ट्रिलियर डॉलर राहिली. ब्रिटनमध्ये हा आकडा 2.83 ट्रिलियर डॉलर आणि फ्रान्समध्ये 2.71 ट्रिलियर डॉरल होता. भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्व्हिस सेक्टर सर्वात मोठे आहे. याची भागीदारी 60% आहे.
 • 149 वर्षांपासून अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था : अमेरिका 149 वर्षांपासून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. दुसऱ्या स्थानी चीन आणि तिसऱ्या जपान आणि चौथ्या स्थानी जर्मनी आहे.

2. व्हॅक्सीनच्या नावे 3 विक्रम : क्लासिकल स्वाइन फीव्हीर, निमोनिया आणि कोरोनाची स्वदेशी लस बनवली

 • इंडियन काउंसिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्चने फेब्रुवारीमध्ये क्लासिकल स्वाइन फीव्हरची नवीन लस विकसित केली. हे स्वस्त आणि प्रभावी ठरेल. हा डुकरांमध्ये होणारा आजार आहे. जुलैमध्ये भारतीय वैज्ञानिकांनी निमोनियाची व्हॅक्सीन तयार केली आणि ड्रग कंट्रोलरकडून मंजूरीही मिळाली. तिसरी सर्वात आवश्यक, कोरोननाची व्हॅक्सीन (कोव्हॅक्सिन)भारत बायोटेकने तयार केली.
 • ही लस यासाठी आवश्यक : क्लासिकल स्वाइन फीव्हीरमुळे प्रत्येक वर्षी देशाला 400 कोटी रुपयांचे नुकसान होते. 2019 पासून डुकरांची संख्या कमी झाली आहे. जगभरात निमोनियाचे जेवढे प्रकरण समोर येतात, त्यामधून 23% भारतात असतात. यामधून 14% ते 30% प्रकरणांमध्ये मृत्यू होतो. देशात कोरोनाच्या रोज हजारो केस अजूनही समोर येत आहेत.

3.कुपोषणाचे कलंक मिटवण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी सर्वाधिक प्रोटीनचे गहू तयार केले

 • भारत सरकारच्या पुणे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय) च्या शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये गव्हाचा एक विशेष प्रकार विकसित केला. त्यात 14.7% अधिक प्रथिने आहेत. या जातीला एमएसीएस 4028 असे नाव आहे. हे सेमी ड्वार्फ वाण आहे. त्याचे पीक 102 दिवसात तयार होते. कुपोषण निर्मूलनासाठी युनिसेफच्या 'व्हिजन 2022' कार्यक्रमांतर्गत गव्हाची ही विविधता विकसित केली गेली आहे.
 • देशातील 14% लोकसंख्येला पूर्ण पोषण नाही: 'व्हिजन 2022' कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुपोषण संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 नुसार भारतातील 14% लोक कुपोषित आहेत. यामुळे मुलांमध्ये वाढ न होण्याचे प्रमाण 37.4% आहे.

4. भारताचे 3 विक्रम : चीननंतर सर्वात जास्त पीपीई किट बनल्या, व्हॅक्सीनचे डोजही बनणार

 • भारत चीननंतर सर्वात जास्त पीपीई किट बनवणारा देश बनला. महामारीच्या सुरुवातीच्या 2 महिन्यात हा विक्रम बनला. मार्चपासून डिसेंबरपर्यंत देशात 6 कोटी पीपीई किट आणि 15 कोटी एन-95 मास्क बनले आहेत. भारताने आतापर्यंत 2 कोटी पीपीई किट आणि 4 कोटी मास्क एक्सपोर्ट केले आहे. देशात कोरोनाचा जीनोम सर्वात पहिले गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांनी शोधला.
 • हैदराबादच्या सीरम इस्टीट्यूजवळ जगात सर्वात जास्त व्हॅक्सीन तयार करण्याची क्षमता आहे. देशात स्वदेशी व्हक्सीन 'कोव्हॅक्सिन' व्यतिरिक्त ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची 'कोविशील्ड', नोवाव्हॅक्सची NVX-CoV2373 आणि रशियाच्या गामालेया रिसर्च इस्टीट्यूटची स्पुतनिक-V व्हॅक्सीनही भारतात तयार होईल.
 • जानेवारीपासून होणार लसीकरण : भारतात कोरोनाच्या तीन व्हॅक्सीनसाठी आपातकालीन मंजूरी मागण्यात आली आहे. यामध्ये कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि अमेरिकन कंपनी फायजरच्या BNT162b2 व्हॅक्सीनचा समावेश आहे. यावर सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची एक बैठक झाली आहे. कंपन्यांकडून काही डेटा मागवण्यात आला आहे. भारत सरकारचा दावा आहे की, जानेवारीमध्ये लसीकरण सुरू होईल.

5. मृत्यूचे ओझे कमी झाले, 30 वर्षात बाल मृत्यूदर 1.25 कोटीने कमी होऊन 52 लाख झाला

 • सप्टेंबरमध्ये जारी संयुक्त राष्ट्रच्या रिपोर्टनुसार, 1990 पासून 2019 च्या काळात भारतात बालमृत्यूदर कमी झाला आहे. 1990 मध्ये मृत्यूचा आकडा 1.25 कोटी होता, जो 2019 मध्ये कमी होऊन 52 लाख झाला. जगात ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यामधून एक तृतीयांश भारत आणि नायजीरियाचे होते. 30 वर्षांमध्ये मुलांच्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये प्रत्येकवर्षी 4.5% ची घट झाली आहे.
 • वेळेपूर्वीच डिलीव्हरी आणि कुपोषण मृत्यूचे कारण : 'इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह' च्या रिपोर्टनुसार, देशात पाच वर्षांखालील 68% मुलांच्या मृत्यूचे कारण म्हणजे आई आणि नवजात मुलांचे कुपोषण हे आहे. कमी वजन आणि अकाली प्रसूती हे 83% मुलांच्या मृत्यूचे कारण आहे.

6. पंतप्रधान मोदी अटलजींचा विक्रम मोडून प्रदीर्घ काळ राज्य करणारे बिगर-कॉंग्रेसी पंतप्रधान ठरले

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट रोजी दोन विक्रम नोंदवले. सर्वप्रथम, त्यांनी प्रदीर्घ काळ देशात राज्य करणारे पहिले बिगर-कॉंग्रेस पंतप्रधान बनले. दुसरे म्हणजे, अटलजी त्यांच्या तीन कार्यकाळात एकूण 2,272 दिवस पंतप्रधान होते, पंतप्रधान मोदींनी त्यांचा विक्रमही मोडला.
 • मनमोहन सिंह, इंदिरा गांधी आणि नेहरू मोदींपेक्षा पुढे: सर्वात प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहण्यामध्ये सर्वात पहिले नेहरु यानंतर दुसऱ्या नंबरवर इंदिरा गांधी आहेत. इंदिरा दोनवेळा एकूण 15 वर्षे 11 महिने 17 दिवस पंतप्रधान राहिल्या. तिसऱ्या नंबरवर मनमोहन सिंह आहेत. मनमोहन सलग 10 वर्षे चार दिवस पंतप्रधान राहिले. पीएम मोदींनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यास ते मनमोहन सिंह यांचा विक्रम मोडतील.

7. चंद्रयान-2 ने चंद्रावरील खड्ड्याचा फोटो काढला, याला इस्रोने विक्रम साराभाईचे नाव दिले

 • चंद्रयान-2 ने ऑगस्टमध्ये चंद्रावरील खड्ड्याचा फोटो काढला. याचे नाव भारतीय स्पेस प्रोग्रामचे जनक विक्रम साराभाईंच्या नावावर ठेवण्यात आले. याच वर्षी त्यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. चंद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत एक वर्ष पूर्ण केले. यानने चंद्राच्या 4400 पेक्षा जास्त फेऱ्या मारल्या आहेत. याला 22 जुलै 2019 ला सोडण्यात आले होते आणि 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते.
 • 7 वर्षे चंद्राला फेऱ्या मारण्या एवढे इंधन : इस्त्रोनुसार, चंद्रयान-2 मध्ये एवढे इंधन आहे की, हे 7 वर्षांपर्यंत चेंद्राच्या फेऱ्या मारु शकते. याच्या ऑर्बिटरमध्ये हायटेक कॅमेरे असल्यामुळे हे चंद्राची माहिती गोळा करुन पाठवू शकते. मिशनचे लक्ष्य चंद्राच्या खालच्या थरावर पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेणे देखील आहे.

8. जनरल बिपिन रावत बनले देशातील पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ

 • जनरल बिपिन रावत यांनी 1 जानेवारीला देशातील पहिल्या चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस)चे पद सांभाळले. यापूर्वी ते सैन्य प्रमुख होते. त्यांचा दर्जा 4 स्टार जनरलचा आहे. जनरल बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी झाला होता, आता तो 61 वर्षांचे आहेत. 2023 मध्ये 65 होतील. या दृष्टीने, त्यांच्याजवळ सीडीएसच्या पदावर राहण्यासाठी किमान 3 वर्षे आहेत.
 • सॅम मानेकशॉ यांना सीडीएस बनवू इच्छित होत्या इंदिरा गांधी : सैन्यामध्ये केएम करियप्पा आणि सॅम मानेकशॉ यांना फील्ड मार्शलची रँक देण्यात आली होती. 1971 च्या युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी मानेकशॉ यांना सीडीएस बनवू इच्छित होत्या. तेव्हा हवाई दल- नौदल प्रमुखांनी आक्षेप घेतला होता. त्यांचा तर्क होता की, यामुळे हवाई दल आणि नौदलाचा दर्जा कमी होईल.

9. हॉकी टीमच्या कॅप्टन राणी रामपाल बनल्या वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द ईयर, हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय

 • भारतीय महिला हॉकी टीमच्या कॅप्टन राणी रामपाल यांना जानेवारीमध्ये वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द ईयर अवॉर्ड मिळाला. हरियाणाच्या राणी हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. या अवॉर्डसाठी जनता वोट करते. एकूण 7,05,610 वोटमधून त्यांना 1,99,477 वोट मिळाले. युक्रेनच्या कराटेपटू स्टेनिसलाव्ह होरुना दुसऱ्या आणि कॅनडाच्या पावरलिफ्टर रिया स्टिन तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
 • खेलरत्न आणि पद्मश्री अवॉर्ड मिळालेल्या राणींनी 240 पेक्षा जास्त मॅच खेळल्या : 1980 समर ऑलिंपिक्सच्या 36 वर्षांनंतर 2016 मध्ये ओलिंपिक्ससाठी भारताने क्वालीफाय केले. या निवडीचे श्रेय राणीने घेतलेल्या ध्येयाला जाते. त्याच्या नेतृत्वातच भारताने तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्रता साधली.

10. भारतीय वकील हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार बनले

 • इग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांना जानेवारीमध्ये आपला सल्लागार म्हणून नियुक्त केले. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने 13 जानेवारी 2020 ला विशेष सल्लागारांच्या लिस्टमध्ये यांच्या नावाचा समावेश केला. महाराणी एलिजाबेथ प्रत्येक वर्षी कॉमनवेल्थ देशांमधून काही सीनियर एडव्होकेट्सची निवड करतात. हरीश साळवे यामधूनच एक आहेत.
 • जगातील सर्वात महागड्या वकीलला पियोना वाजवण्याची आवड : हरीश साळवेंचा जन्म महाराष्ट्राच्या नागपुरात 1956 मध्ये झाला. वडील नरेंद्र साळवे काँग्रेस नेता होते. हरीश जगातील सर्वात महागड्या वकीलांमधून एक आहेत आणि त्यांना पियानो वाजवण्याची आवड आहे. गेल्या वर्षी कुलभूषण जाधव यांची केस त्यांनी सांभाळली. या व्यतिरिक्त मुकेश अंबानी, सलमान खान, वोडाफोन आणि इटली सरकार यांचे क्लाइंट राहिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...