आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccine Supply; Narendra Modi Govt Will Export Vaccine Abroad Next Month

परदेशात लस निर्यात करणार भारत:आरोग्य मंत्री म्हणाले - पुढील 90 दिवसांच्या आत देशात 100 कोटी लसींचा स्टॉक असेल, अतिरिक्त व्हॅक्सीन विदेशात पाठवणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगल्या आरोग्य सुविधांसाठी सर्व AIIMS ने सहयोग करावे

पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना कोरोना लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात करेल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, व्हॅक्सीन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल. COVAX कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करून भारत वसुधैव कुटुंबकमाचे ध्येय पूर्ण करेल. यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल.

मांडवीया म्हणाले की, पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये देशाला लसीचे 300 कोटी डोस मिळतील. यासह, भारताकडे पुढील 90 दिवसांमध्ये 100 कोटी लसींचा साठा असेल. जर सर्व काही ठीक झाले, तर भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये व्हॅक्सीन मैत्री अंतर्गत कोव्हॅक्स देशांना लस पुरवण्याच्या स्थितीत असेल.

ते म्हणाले की, हे सर्व देशाच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच केले जाईल. आमचे सर्वात मोठे प्राधान्य म्हणजे आपल्या नागरिकांना लसीकरण करणे हे आहे. यानंतरच देशाबाहेर लस पुरवण्याचा विचार केला जाईल.

10 दिवसात दिले गेले 11 कोटी डोस
मांडवीया पुढे म्हणाले की, देशभरात लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यास गती दिली जात आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी (17 सप्टेंबर) देशभरातील 2.5 कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले. आपल्यासाठी तो ऐतिहासिक दिवस होता. देशात आतापर्यंत 81 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. शेवटचे 10 कोटी डोस फक्त 11 दिवसात दिले गेले आहेत.

चांगल्या आरोग्य सुविधांसाठी सर्व AIIMS सहयोग करावे
मांडविया यांनी सर्व एम्सला एकमेकांशी समन्वय साधण्यास सांगितले आहे. यामुळे जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यांनी सोमवारी नवी दिल्ली एम्स येथे बैठक घेऊन देशातील 6 एम्सचा आढावा घेतला.

ते म्हणाले की, एम्समधील आधुनिक पायाभूत सुविधा आणि अनेक आजाराच्या स्पेशलिस्ट विभागाचे बांधकाम आणि संशोधन यावर चर्चा झाली. मी देशातील सर्व एम्सला एकमेकांशी समन्वय साधण्याचे आवाहन करतो जेणेकरून आपण जनतेला उत्तम आरोग्य सेवा देऊ शकू.

बातम्या आणखी आहेत...